नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील आंबेडकरवादी मशीन परिसर व 20मधील राहुल नगर भागात गेल्या आठ ते दहा वर्षे पुर्वी नव्याने नळ पाईप लाईन टाकुन ही केवळ क्रास नळकनेकशन न दिल्याने दलीत वस्त्या मधील नागरीकांना तिव्र पाणी टंचाई ना समोरे जावे लागत असल्याचे पत्र माजी नगरसेविका सौ.वैजयंती गायकवाड यांनी महापौर जयश्री ताई पावडे यांना दिले असून संबंधित पत्राची दखल घेत तात्काळ पाणीपुरवठा विभागाला या बाबत सुचना केली असल्याने हा प्रश्न निकाली लागल्या ची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड शहराचा जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेत समावेश करुन शहराच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी खेचुन आणला, याच नीधीतुन नांदेड शहरातली कालबाह्य झालेली पाणीपुरवठा पाईप लाईन नव्याने टाकण्यात आली. सदरील पाईप लाईन टाकून जवळ जवळ ८ ते १० वर्ष पुर्ण होत आहेत.
परंतु सिडको शहराच्या प्रभाग क्रमांक १९ मधील आंबेडकरवादी मिशन परीसर आणि यशोधरा नगर दलीत वस्त्या तसेच प्रभाग क्रमांक २० मधील एन.डी. 41 राहूल नगर या दलीत वस्तीत टाकण्यात आलेल्या पाईप लाईन चे क्रास कनेक्शन अद्याप करण्यात आले नसल्यामुळे या भागातील नागरिकांना मनपाचा कर भरणा करुनही हक्काच्या पाण्यापासुन वंचीत रहावे लागत आहे. जमीनीतील पाणी पातळी ५०० फुट खोल गेल्यामुळे हातपंपालाही पाणी येत नाही. अधिकारी व पदाधिकार्याच्या उदासीनतेमूळै प्रकल्प उशाला अन् कोरड घशाला अशी जनतेची अवस्था झाली आहे.
माजी नगरसेवीका सौ. वैजयंती गायकवाड यांनी आज महापौर सौ. जयश्रीताई पावडे यांची भेट घेऊन ही बाब त्याच्या निदर्शनास आणली. महापौरांनी या बाबत तत्परतेने कार्यवाही करुन पाणी पुरवठा विभागाला एक्षन टेकन रिपोर्ट दोन दिवसांत सादर करण्याच्या सुचेना दील्या आहेत. त्यामुळे दुर्लक्षित असलेला दलीत वस्तीतील पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी अपेक्षा सौ.वैजयंती गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.