उस्माननगर, माणिक भिसे। येथील महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवरील फोटोची विटंबना करणाऱ्या समाजकंटकास उस्माननगर पोलिसांनी अटक करून त्यास कोर्टा समोर हजर करून चार दिवसाचा पि.सी.आर. मिळाला आहे. त्याची चोकशी नंतर खरे सुत्रधार कोण हे कळणार आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उस्माननगर येथे दि.७ मे व १७ मे या तारखेच्या मध्येरात्री विकृत बुद्धीच्या समाजकंटकाकडून बस स्डॅडवरील रोडच्या कडेला असलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवरील फलकावरील प्रतिमेची विटंबना केली होती.यामुळे बसवप्रेमी एकजूट होऊन रस्त्यावर उतरून आंदोलन, जाळपोळ केली होती.पोलिस प्रशासनाला आवाहन केले होते.या आवाहाना स्वीकारून उस्माननगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे ,उपविभागीय पोलिस अधिकारी थोरात, यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाची नियुक्ती करून त्या समाजकंटकाचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते.
येथील आरोपी (वाशी ) मुंबई येथे आसल्याचे समजताच स.पो.उपनिरीक्षक पल्लेवाड ,बीट जमादार भारती ,पो.का.बालाजी राठोड या पथकाने (तेराशे).१३ शे किलो.मिटर ५२ तासांत वाहानातून प्रवास करत सदरील आरोपीला पकडण्यात यश आले.उस्माननगर पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी आरोपीला पकडून कोर्टात हजर करण्यात आले असून चार दिवासाचा पि.सी.आर. काढण्यात आला आहे.त्यामुळे खरा सुत्रधार कोण हे कळणार आहे. बसवप्रेमी उस्साननगर पोलिसांच्या कामगिरी बद्दल कौतूक करित आहेत...