नविन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले होमगार्ड दता खोशे हे ३५ वर्षांची सेवा बजावुन ४ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी केलेले कार्य हे उत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांनी सांगितले.
ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले होमगार्ड दता खोशे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात,तर प्रमुख पाहुणे म्हणून सपोनी संकेत दिघे, पत्रकार रमेश ठाकूर, शिवाजी राजुरकर, यांच्यी ऊपसिथीत होती.
या कार्यक्रमास होमगार्ड गोपीनाथ जाधव,दिपक घोडके, वैभव कदम, अब्दुल हफीज, सचिन गोडबोले,सुनिता कुलकर्णी,कोमल गायकवाड, ईमरन खान , म्हस्के, बालाजी दंतपाले, बालाजी चौधरी यांच्या सह होमगार्ड ऊपसिथीत होते.या वेळी होमगार्ड यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. सुत्रसंचलन दिपक देशपांडे यांनी केले. खोशै यांनी २५ वर्षांचा सेवा काळात रोपय महोत्सव व १० वर्षांचा सेवा पदक व गुरूता गद्दी ३३ दिवस उत्कृष्ट सेवा बजावली आहे.