नांदेड| उषाताई धोंडगे पत्रकारिता महाविद्यालयात ध्वजरावहन आणि महापुरुषांच्या प्रतिमान अभिवादन करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र सोनकांबळे आणि संस्थेचे पदाधिकारी सिद्धेश्वर पाटील शेळके यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी वरिष्ठ लिपिक रघुनाथ पाटील कदम,निलम भराडे,विद्यार्थिनी प्रियंका डवरे,राशी रिटे,पूजा देशमुख,सेविका जयश्री शिंगाडे आदी उपस्थित होते.