किनवटच्या मांडवी येथील बियर बारमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 23 लाखांचा मुद्देमाल जप्त; 31 जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल -NNL


किनवट/नांदेड।
जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील येणाऱ्या मांडवी येथिल एका बियर बारमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर मिळालेल्या गुप्त माहितीवरून धाड टाकण्यात आली. ही कार्यवाही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग नांदेड व मांडवी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून तब्बल 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर 31 जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


किनवटच्या मांडवी परिसरातील नंद बियर बारमध्ये काही दिवसांपासून लाखो रुपयांची उलाढाल होणारा झन्नामन्ना नावाचा जुगार अड्डा चालू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा नांदेड पथकास मिळाली होती.या ठिकाणी तेलंगणातील अनेक जुगारी महागड्या गाड्या घेऊन जुगार खेळण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांनी होती. यानुसार पथकासह मांडवी पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत जुगार अड्ड्यावर दि. 23 मे रोजी धाड टाकली. 


येथे तीन टेबलावर वेगळ्या ठिकाणी 31 जुगारी पैसे लावून खेळत व खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून रोख रक्कम 1 लाख 46 हजार 220 रुपये व 22 लाख 51 हजार 500 रुपये किमतीच्या सहा चार चाकी वाहन व जुगाराचे साहित्य असा एकूण 23 लाख 31 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 31 जणांवर मांडवी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल उदय राठोड, शेख चांद, सुरेश घुगे व मांडवी पोलीस ठाण्याचे सपोनि मल्हार शिवरकर,पोउपनि शिव प्रसाद कराळे, पोलीस उपनिरीक्षक पठाण, मडावी, कोडमवार जाधव आदींनी केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी