धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून विष्णुपुरी रुग्णालयातील सर्जिकल आयसीयु मधील रूग्णांना एअर बेड -NNL


नांदेड|
भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील सर्जिकल आयसीयु मधील रूग्णांना एअर बेड देऊन अनोख्या पद्धतीने भाजपाचे ब्रीद वाक्य सेवा ही संघटन पूर्ण करण्यात आले. 

भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते गरजू रुग्णांना हवेच्या गाद्या देण्यात आल्या. यावेळी भाजपा वर्धापनदिन नांदेड प्रभारी अनिलसिंह हजारी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुशीलकुमार चव्हाण, भाजपा कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सागर जोशी, सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक अक्षय अनिलकंठवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सुरुवातीला प्रास्ताविक करतांना दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की, शासकीय रुग्णालयातील प्रगती निलपत्रेवार यांनी फोन करून एअर बेडची आवश्यकता असल्याचे सांगितल्यामुळे विश्वजीत मारुती कदम धानोरा, स्नेहलता जयस्वाल हैदराबाद, डॉ. राजेंद्र मुंदडा, सतीश सुगनचंदजी शर्मा, प्राचार्य आत्माराम पळणीटकर , दिलीप ठाकूर, कै. रेणूकाबाई द्वारकादासराव बच्चेवार यांच्या स्मरणार्थ प्रा. दीपक बच्चेवार यांच्यातर्फे हवेच्या गाद्या देण्यात आल्या आहेत. 

प्रवीण साले यांनी मार्गदर्शन करतांना असे सांगितले की, दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून भाजपाचे अखंडित सेवाकार्य सुरू असून कोरोना लसवंतांना मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्किट वितरणाला विक्रमी ३८६ दिवस पूर्ण झाल्यानंतर आयसीयू मधील रुग्णांसाठी हवेच्या गाद्या देण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम घेणारे दिलीपभाऊ ठाकूर यांचे करावे तितके कौतुक कमी आहे. 

याप्रसंगी सागर जोशी यांच्यातर्फे रुग्णांना शीतपेयांचे वाटप करण्यात आले. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथील सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल टेकाळे,प्रगती निलपत्रेवार,एल. आर. आपटे ,तपस्वी कुंभार यांच्यासह अनेक वैद्यकीय कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक या वेळी उपस्थित होते. वर्षभरातील ७६ उपक्रमांमध्ये आणखी एका उपक्रमाची भर पडल्यामुळे दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी