हदगाव, शे चाँदपाशा | कोरोनामुळे शासनाने निर्बध लावले होते आता ते ते पुर्णपणे काढण्यात आले असुन, आपण सर्वजण रामनवमी व भारतरत्न बाबासाहेब आबेडकर यांची जयती साजरी करु या असे अहवान हदगांव तालुक्याचे तहसिलदार तथा दंडाधिकारी जिवराज डापकर यांनी बुधवारी पोलिस स्टेशन मध्ये आयोजित केलेल्या शांतता बैठकीत केले.
ते पुढे म्हणाले की या निमित्तानं सामाजिक सलोखा दृष्टिकोन ठेवुन रामनवमी व डाँ बाबासाहेब आबेडकर यांच्या सामाजिक विचार समाजापुढे मांडुन एक नवीन आदर्श निर्माण करण्याची संधी या जयती निमित्तानं मिळत असते. दि १० एप्रिलला रामनवमी व १४ एप्रिल रोजी भारतरत्न बाबासाहेब आबेडकर यांची जयंती साजरी केली जात असते. या निमित्तानं शहरातील नागरी समस्यांचा बाबतीत ही प्रश्न उपस्थित करण्यात येतात. यावेळी प्रामुख्याने शहरातील खड्डे लगेच बुजविण्यात येवुन पिण्याच्या पाण्याची पण सोय करण्यात येईल.
मिरवणूकीत डिजेच्या वाजविण्याच्या बाबतीत शासनाचे नियम व पोलासांनी केलेल्या सुचनांचे पालन करावे अशी सुचना ही हदगांव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरक्षक हनुमंत गायकवाड यांनी दिल्या. तसेच मिरवणूक रँली याञा निमित्तानं रस्त्यावरील खड्डे साफसफाई लाईट पोल पिण्याच्या पाण्याची सोय या बाबतीत न.पा.मुख्याधिकारी दामोधर जाधव यांनी न.पा. प्रशासन सतर्क असल्याचे सांगितले. यावेळी हदगांव पोलिस स्टेशनला नव्यानेच रुजु झालेले सह्याक पोलिस निरक्षक भोसले यांनी यांनी सर्वाचे अभार मानले.
हे अनुउपस्थित का ...? शहरात रामनवमी बाबासाहेब आबेडकर व महाविर जयंती निमित्तानं पोलिस स्टेशनने आयोजित केलेल्या शांताता बैठकीला शहरातील व परिसरातील जबाबदार नेते जेष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते माञ यांची अनुपस्थिती दिसुन आली. तसेच नेहमी प्रमाणे प्रशासनाने नागरिकाकडुन सहकार्याची अपेक्षा केली. माञ पोलिस प्रशासन माञ आपली पोलिस संख्या वाढविण्यात काय अडचण आहे. या बाबतीत ही प्रश्न उपस्थित करण्यात आले असता माञ या बाबतीत पोलिस प्रशासना कडुन समाधानकारक उत्तर मिळु शकले नाही. या बाबतीत पोलिस अधिक्षक कार्यालयातिल जेव्हा एखादा वरिष्ठ पोलिस अधिकारी हदगाव पोलिस स्टेशनला भेट देत असतात. तेव्हा शहरातील व परिसरातील नागरिक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सामाजिक दृष्टिकोनातून काही त्यांच्या पातळीवरील सुचना मांडायच्या असतात त्यावेळी माञ हे वरिष्ठ पोलिस अधिकारी भेट नाकारतात.
यामुळे पोलिस व नागरिक यांचा समन्वय केवळ एखाद्या शांताता बैठकीतच होतो ही वस्तुस्थिती मांडली असता याबाबतीत हदगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक हनुमंत गायकवाड यांनी आता यापुढे असे होणार नाही. जे काही सामाजिक दृष्टिकोनातून ज्या सुचना असतील त्यांची दखल घेण्यात येईल व भेटीला आलेल्या नागरिकांना वरिष्ठ पोलिस अधिका-याची भेट होईल अस त्यांनी सागितले.