नांदेड रेल्वे विभागाला पहिल्यांदाच मिळाली मानाची ‘सर्वोत्कृष्ठ कार्यक्षमता ढाल’ -NNL


नांदेड|
169 वर्षा पूर्वी, दिनांक 16 एप्रिल 1853  ला भारतात पहिल्यांदाच बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे दरम्यान रेल्वे धावली होती. त्या क्षणाच्या स्मरणात भारतीय रेल्वे दर वर्षी या महिन्यात रेल्वे सप्ताह साजरा करत असते. यात रेल्वे सेवेत वर्षभर उत्कृष्ठ कार्य करण्याऱ्या रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांना पुरस्कार देवून गौरवण्यात येते.  

दक्षिण मध्य रेल्वे मध्ये 6 विभाग आहेत. विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या विभागाला विविध कार्यक्षमता ढाल देवून  गौरविण्यात येते. या सहा विभागात ज्या विभागाने सर्वच क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे त्या विभागाला सर्वात जास्त मानाची  समजली जाणारी ‘महाव्यवस्थापक सर्वोत्कृष्ठ कार्यक्षमता ढाल’ ( General Manager’s Efficiency Shield for Overall best Performance) देवून गौरविण्यात येते.    

नांदेड रेल्वे विभागाला यापूर्वी विविध क्षेत्रातील ढाल मिळाल्या आहेत. नांदेड रेल्वे विभागाने आपल्या स्थापणे पासून म्हणजेच एप्रिल-2003 पासून पहिल्यांदाच हि सर्वात जास्त मानाची समजली जाणारी  “महाव्यवस्थापक सर्वोत्कृष्ठ कार्यक्षमता ढाल’ मिळवली आहे.  नांदेड रेल्वे विभागाला हि ढाल सिकंदराबाद विभागा सोबत विभागून देण्यात आली आहे.

आज दिनांक 20 एप्रिल  रोजी श्री अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे याच्या हस्ते सिकंदराबाद येथे मुख्यालयात झालेल्या शानदार सोहळ्यात हि ‘सर्वोत्कृष्ठ कार्यक्षमता ढाल’ श्री उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना देण्यात आली. 

या अशाबद्दल श्री उपिंदेर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नांदेड यांनी नांदेड रेल्वे विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या वर्षी या सर्वोत्कृष्ठ कार्यक्षमता ढाल सोबतच नांदेड रेल्वे विभागाने राजभाषा ढाल (Rajbhasha Shield),  रेल्वे फाटक निर्मुलन ढाल (Best Division for Elimination of Level Crossings),  उत्कृष्ठ मालवाहतूक प्रयत्न ढाल (Best Loading Effort Shield) या आणखी तीन ढाल मिळाल्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी