जनतेच्या आरोग्यासाठी आता सोनोग्राफीसह विविध सुविधा उपलब्ध करून देणार - आ.जवळगावकर -NNL

हिमायतनगरातील महाआरोग्य मेळाव्यात ४ हजाराहून अधिक नागरिकांना घेतला फायदा 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने सर्वरोग उपचार, निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ उपस्थित झालेल्या सर्व रुग्णांनी घ्यावा, आगामी काळात या रुग्णालयात सोनोग्राफी सह विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे अभिवचन हदगाव विधानसभेचे आ. माधवराव पाटील जवळगावकरांच्या यांनी दिले.

ते हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य मेळाव्याच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. सुरुवातील आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी धन्वंतरी देवीच्या प्रतिमेचे पूजन आणि दिप्रज्वलन करून मेळाव्याचे उदघाटन केले. यावेळी मंचावर तहसीलदार डी.एन. गायकवाड, गटविकास अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड, गट शिक्षणाधिकारी माधवराव वानोळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.डी.डी. गायकवाड, माजी जी.प.सदस्य सुभाष दादा राठोड, सत्यव्रत ढोले, खरेदी विक्री संघाचे संचालक परमेश्वर गोपतवाड, सोसायटीचे चेयरमन गणेशराव शिंदे, कृउबाचे सभापती डॉ.प्रकाश वानखेडे, शहराध्यक्ष संजय माने, माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, सोसायटीचे संचालक सुभाष शिंदे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कोमावार, खा.हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार, फेरोज कुरेशी, परमेश्वर भोयर, आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. 

या शिबिरासाठी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. तसेच मागील दोन वर्षाच्या कोरोना काळात जीवाची परवा न करता रुग्णसेवा देणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी संदेश पोहरे, वैद्यकीय अधिकारी दामोधर राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ.वैभव नखाते, डॉ.अभिमन्यू केंद्रे, अफरोज सौदागर, कृष्णा चौधरी, राजीव  नागमवाड यांच्यासह आरोग्य सेविका, आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आणि शिबिराची सुरुवात करण्यात आली. 


यावेळी पुढं बोलताना आ.जवळगावकर म्हणाले कि, येथील ग्रामीण रुग्णालयाच्या व्याप्तीचे काम सुरु आहे, आता ५० बेडसाठी मंजुरी मिळालेली आहे. वरील इमारतीत जाण्यासाठी रुग्णांना लिफ्टची सोय केली जाणार आहे. त्यामुळे रुग्णाला मोफत रुग्णसेवा मिळण्यात अडचण जाणार नाही. आणखी जे काही करता येईल ते मी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, ब्लड बैन्कसाठी टेक्निशियन लवकरच उपलब्ध होईल. दिव्यांगांना प्रमाणपत्र याचं मतदार संघात मिळावा म्हणून येणाऱ्या काळात सुविधा उपलब्ध करणार आहे. आता सोनोग्राफी सुविधा देखील मंजूर झाली तीही लवकरच सुरु होईल, गरजू रुग्नांना शक्यतोवर येथेच सुविधा उपलब्ध करून द्या, आणि गरज भासल्यास रुग्णांना नांदेडला देखील मोफत आरोग्य सेवा कशी मिळेल यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले पाहिजे. तालुका आरोग्य कार्यालयासाठी अन्य ठिकाणी लवकरच जागा उपलब्ध करून देण्यात येईल. आणि सर्व रुग्णांनाही घाई गरबाड न करता शांततेत सर्वानी शिबिरात तपासणी करून घ्यावी जोपर्यंत सर्वांची तपासणी होणार नाही तोपर्यंत शिबीर चालू राहणार असल्याने सर्वानी सहकार्य करावे असे आवाहनही जवळगावकर यांनी उपस्थितांना केले.  


या शिबिरासाठी उपस्थित झालेल्या शहर व ग्रामीण भागातही रुग्णांची तपासणीला सुरुवात झाली. शिबिराचे सुंदर असे नियोजन करण्यात आल्याने या शिबिरात जवळपास ४ हजार ६९७ नागरिकांनी सहभाग घेतला. या आरोग्य मेळाव्यामध्ये भिषक, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, दंतशल्य चिकित्सक, त्वचा रोग या सर्व तज्ञानि उपस्थित होऊन रुग्णना सेवा उपलब्ध करून दिल्या. तसेच वेलनेस अँक्टीव्हीटी, योगा, मेडीटेशन (ध्यान) या बद्दल समुपदेशन करण्यात आले. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे नागरिकांना डिजिटल आरोग्य आयडी तयार करून देण्यात आल्याने त्यांना 5 लक्ष रुपयाच्या खर्चपर्यंत आगामी काळात उद्भवलेल्या आजाराचे निदान आणि उपचार केला जाईल. तसेच ज्यांचे यादीत नाव आलेले आहे, अश्यांचे आयुष्मान भारत गोल्ड कार्ड तयार करून देण्यात आले. तसेच शिबिरात विविध प्रकारच्या रक्‍त, लघवी तपासण्या निदान व औषधोपचार मोफत देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डी.डी.गायकवाड यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली. 


या शिबिराचे सुरेख असे सूत्रसंचालन बालाजी वाघमारे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी ग्रामीण रूग्णालय हिमायतनगर येथील वैद्यकीय अधिकारी, सर्व कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व अधिकारी व कर्मचारी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, सर्व आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था सादिक चातारकर यांनी केली होती. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी