नांदेड| राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अजिंक्य सदाशिवराव देशमुख यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील आणि विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मान्यतेने मराठवाडा अध्यक्ष प्रशांत कदम यांनी केली आहे. या नियुक्तीचे पत्र नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी देऊन अभिनंदन केले आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अजिंक्य देशमुख रा. पिंपळगावकर ता. अर्धापूर यांची निवड केली आहे. या नियुक्तीचे पत्र नांदेड जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रा. डी.बी. जांभरूणकर, जिल्हा उपाध्यक्ष गजानन पांपटवार, उद्धवराव राजेगोरे, विक्रम देशमुख, यशवंत कांबळे, बडोदे, चंद्रकांत टेकाळे, गोविंद कल्याणकर, मोहम्मद दानिश, प्रसाद राजेगोरे, अमोल राजे, विश्वनाथ बडुरे, संदीप राऊत, दत्ता पारवे आदी जणांची उपस्थिती होती. या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.