सिनेगायिका वैशाली भैसने-माडे यांचा आज नांदेड जिल्हा परिषद परिसरात भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन -NNL


नांदेड|
क्रांतीसूर्य जोतिराव फुले व विश्‍वरत्‍न, युगपुरुष, बोधिसत्‍व भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्‍त जंयती मंडळाच्‍या वतीने आज बुधवार दिनांक 27 एप्रिल रोजी नांदेड जिल्‍हा परिषद परिसरात भीम महोत्‍सव 2022 चे अयोजन करण्‍यात आले आहे. यात महाराष्‍ट्रातील सुप्रसिध्‍द हिंदी-मराठी सिनेगायिका वैशाली भैसने-माडे व संचाचा प्रबोधन गीतांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 6 वाजता जिल्‍हा परिषद परिसरात होणा-या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात येणार आहे.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी शिवप्रकाश चन्‍ना, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, रेखा काळम-कदम, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी माध्‍यमिक प्रशांत डिग्रसकर, समजाकल्‍याण अधिकारी आर.एच. एडके, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्‍हा पशुसंर्वधन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, जिल्‍हा कृषी अधिकारी तानाजी चिमनशेट्टे, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, एस.एस. तायडे, ओमप्रकाश निला, ए.आर. चितळे, आनंद भोजराज आदींची उपस्थिती राहणार आहे.

यावेळी सिनेगायिका वैशाली भैसने-माडे व संचाच्‍या प्रबोधन बुद्ध-भिम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास जिल्‍हा परिषद अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन जयंती मंडळाचे अध्यक्ष अशोक कासराळीकर, कार्याध्यक्ष सिद्धार्थ हत्तींबिरे, सचिव बालासाहेब लोणे, कोषाध्यक्ष राजेश जोंधळे, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद व्यवहारे, डॉ. विलास ढवळे, गणेश अंबेकर यांच्‍यासह भिमजयंती मंडळाचे पदाधिका-यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी