नांदेड| शहरातील माला पेट्रोल पंपासमोर मोटार सायकल क्रं एमएच-26/एजी-6735 हि पंपावर पेट्रोल भरून वळुन घेत असतांना शर्मा ट्रॅव्हल्सच्या गाडी क्रं एमपी-30/पी-0430 हि माळटेकडी पुलाकडुन नमस्मार चौकाकडे येत असतांना हयगय व निष्काळजी पणे वाहन चालवुन दुचाकीला उडविल्याने एकाचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस सूत्रांनी दिलेल्या पत्रकानुसार सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पेट्रोल भरून निघणाऱ्या दुचाकीला ट्रैव्हल्सने जोराची धडकदिली. या अपघातात इंदुबाई शिवानंद डांगे, वय 25 वर्षे, रा. जवळा ता. मुदखेड यांचे मरणास कारणीभुत झाला. तर शिवानंद मारोती डांगे, वय ३० वर्षे, रा. जवळा ता. मुदखेड जि. नांदेड, चंद्रकांत गोविंदराव मोरे, वय ३१ वर्षे, रा. त्रिकुट ता. जि.नांदेड यांना गंभीर दुखापत झाली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोनि श्री अनिरूध्द काकडे, पोउपनि श्री गौंड, सपोउपनि. बाबा गजभारे, पोलीस अंमलदार कानगुले, दारासिंग राठोड, बंडू कलंदर, गंगावरे हे ताटाकल घटना घडलेल्या ठिकाणी पोचले आणि पंचनामा केला. अशी महैरी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने जरी केली आहे.
.jpg)