अन्यथा पुढील आठवड्यात माकपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
सदरील निंदनीय घटनेच्या संदर्भात तातडीने कारवाई करावी आणि प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे अशी मागणी माकपच्या वतीने करण्यात आली आहे. पुढील आठ दिवसात योग्य कार्यवाही झाली नाही तर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे माकपच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभणे, कॉ.उज्ज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.मीना आरसे, कॉ.मारुती केंद्रे, कॉ.लता गायकवाड, कॉ.नागनाथ पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.