मराठी समाजशास्त्र परिषदेचा २०२१ चा उत्कृष्ट प्राध्यापक व संशोधन पुरस्कार प्रा.डॉ. घनश्याम येळणे यांना प्रदान -NNL


नांदेड। 
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सामाजिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. घनश्याम येळणे यांना रत्नागिरी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या २०२१ च्या मराठी समाजशास्त्र परिषदेच्या अधिवेशनात ‘डॉ. प्रदिप आगलावे उत्कृष्ट प्राध्यापक व संशोधन पुरस्कार’ देऊन सपत्निक सन्मानित करण्यात आले. 

समाजशास्त्र विषयाच्या विकासामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर केलेल्या अध्ययन व अध्यापन आणि संशोधनात केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल हा सन्मान दरवर्षी दिला जातो. २०२१ चा पुरस्कार हा प्रा. डॉ. घनश्याम येळणे यांना मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. पी.जी. जोगदंड यांच्या हस्ते देण्यात आला. 

प्रा. डॉ. धनश्याम  येळणे हे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत तसेच आर.आर. समिती आणि आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे ते सदस्य आहेत. समाजकार्य अभ्यास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. समाजकार्य  या विषयावर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषद त्यांनी शोधनिबंध सादर केलेले आहेत. ग्रामीण भागातील महिलांच्या स्वयंसहाय्यता बचत गटाच्या निर्मितीमध्ये त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. 

पुरस्कार वितरण समारंभास मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. नारायण कांबळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संचालक व समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रुती तांबेडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील समाजशास्त्र विभागाचे डॉ. एस. एल. गायकवाडडॉ. संजय साळुंखेमुंबई विद्यापीठातील विभाग प्रमुखसामाजिकशास्त्र विभागाचे डॉ. बालाजी केंद्रे, गोंडवाना विद्यापीठगडचिरोली येथील संचालकसमाजशास्त्र विभागाचे डॉ. धनराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसलेप्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेनकुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदेपरीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, अधिष्ठाता डॉ. वैजंयता पाटील, डॉ. वसंत भोसले, डॉ. एल. एम. वाघमारे व डॉ. अजय टेंगसे यांनी डॉ. घनश्याम येळणे यांचे अभिनंदन केले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी