नांदेड| राष्ट्रिय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यागमुर्ती महादेवजी जानकर यांच्या ५४व्या वाढदिवसानिमित्ताने १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता 'लहुजी साळवे निराधार निराश्रित बालकाश्रम, नांदेड येथे अनाथ विद्यार्थ्यांना--शालेय साहित्य व फळ वाटपाचा कार्यक्रम राष्ट्रिय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवाजीराव इंदूरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रिय समाज पक्षाचे जिल्हाकार्यकरिणी नांदेड रासप जिल्हाध्यक्ष व युवाध्यक्ष नितिन सापनर यांनी केले होते,या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीयसंघटक गोविंदराम शूरणर व जिल्हा महिलाध्यक्षा अॅड. चंद्रभागा काळे, प्रा.बालाजी नाईक ,प्रा. राजेंद्र बंदखडके , सुर्यवंशी राहुल उपस्थित होते.
कार्यक्रमात निराधार विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल,रबर, वही व तसेच केळी,चिकू,अंगूर फळ वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रितम तोडकर, शेलैष राठोड,निखिल शेकडे,अमोल बासेवाड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
