नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांची जागतिक स्तरावरील ए डी (अल्पर आणि डोगर ) सायंटिफिक इंडेक्स द्वारा सायंटिस्ट मधून नुकतीच उत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून नाव जाहीर झाले आहे.
ए डी सायंटिफिक इंडेक्स द्वारा दरवर्षी जगभरातील उत्कृष्ट शास्त्रज्ञांचे नाव जाहीर करण्यात येत असतात. मागील पाच वर्षातील त्यांच्या संशोधनावर आधारित हा रँक ठरविण्यात येत असतो. या संशोधनामध्ये समाज उपयोगी संशोधनाला महत्त्व आहे. या रँक मध्ये येण्यासाठी नऊ मापदंड ठरविण्यात आलेले आहेत. २१५ देशांतील ११२ विषयांमधील शास्त्रज्ञांचा अभ्यास या ए डी इंडेक्स द्वारा केल्या जातो. त्यानंतर त्यांचा रँक ठरविण्यात येतो.
डॉक्टर उद्धव भोसले यांच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान मधून इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग या विषयांमध्ये निवड झालेली आहे. त्यांच्याबरोबरच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामधून प्रो राजाराम माने, डॉ वसंत वाघ, डॉ काशिनाथ बोगले, प्रो शैलेश वाढेर, प्रा राहुल पिंजारी, प्रा अनिकेत मूळे, प्रा अनुपमा पाठक, प्रा संजय पेकमवर, प्रा कृष्णा चैतन्य, प्रो ज्ञानेश्वर पवार, प्रो के विजयकुमार, प्रा अर्जुन भोसले इत्यादी प्राध्यापकांची नावे ही या इंडेक्सद्वारे जाहीर करण्यात आलेली आहेत.
या त्यांच्या निवडीबद्दल प्र-कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ सर्जेराव शिंदे, वित्त व लेखा अधिकारी आनंद बारपुते, ते परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ रवी सरोदे, अधिष्ठता डॉ एल एम वाघमारे, अधिष्ठता प्रा अजय टेंगसे, अधिष्ठता डॉ वसंत भोसले, अधिष्ठता प्रा वैजयंता पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ अर्जुन भोसले, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा वैजनाथ अनमुलवाड, संकुलाचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, यांनी त्यांच्या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.