सुजलेगाव येथे हनुमान जयंती शोभायात्रासह परंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न -NNL


नायगाव, दिगंबर मुदखेडे|
नायगाव तालुक्यातील मौजे सुजलेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने तालुक्यासह परिसरातील सर्व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती हनुमान जयंती निमित्त पारंपरिक पद्धतीने साजरे केलेले संस्कृतीत कार्यक्रमासह वाघ वानर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

सकाळी हनुमान जन्म झाल्यानंतर हजारो भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान जन्मोत्सव निमित्त दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी पहाटे मोठ्या उत्साहाने पालखी सोहळा भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पालखी सोहळ्यामध्ये दींडी पथक भजनी मंडळ यांच्यासह, सांस्कृतिक कार्यक्रम टिपरी ,लेझीम ढोल, बाल कलावंत विविध वेशभूषेत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली, यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानदीप कोचिंग क्लासेस संचालक पंढरी तुमवाड सर, सुखदेव पंचाळ ,बाबू पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रेचा मोठ्या उत्साहाने कार्यक्रम संपन्न झाला. 

त्यानंतर ह. भ. प. डॉ. दिगंबर महाराज गडगेकर यांच्या उपस्थितीत काल्याचे कीर्तन व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. सायंकाळी ठीक 5 वाजता पारंपारिक रित्या चालत आलेल्या वाघ वानर या कलावंतांची कला सादर करण्यात आली मोठा वाघाच्या भूमिकेत मारोती विठ्ठल पांचाळ, छोट्या वाघाच्या भूमिकेत लक्ष्मण त्याचबरोबर वानराच्या भूमिकेत नागोराव शिंदे कला सादर केली त्याचबरोबर लोक प्रसिद्ध शाहीर शाहीर दिगू तुंमावाड यांच्या मार्गदर्शनाखाली व महारुद्र सांस्कृतिक नाट्य मंडळ सुजलेगाव यांच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. कला महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे मांजरमकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे.

त्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित पत्रकार एस एम मुदखेड कर, नायगाव तालुका पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष नागेश पाटील कल्याण, TV9 चे तालुका प्रतिनिधी तानाजी शेळगावकर, शंकर बिराजदार सर, पवन गादेवार, प्राध्यापक ज्ञानेश्वर बैस, कलावंत शाहीर दीगु तूमवाड, शाहीर बळीराम जाधव, दिगंबर जाधव, सरपंच प्रतिनिधी भगवान देशमुख तुकाराम पाटील जाधव कुंटूरकर, उपसरपंच लक्ष्मणराव पाटील, यांच्यासह गावातील कलावंतांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन जितेंद्र देशमुख सर यांनी केले तर तांलुक्‍यात सह परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाचा भरभरून आस्वाद घेतला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी