"जीवन सुंदर आहे " व्याख्यानाला नांदेडकरांचा भरभरून प्रतिसाद
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण केंद्र नांदेड चा उपक्रम
नांदेड| जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला दुःख असत... पण दुःखात सुद्धा आनंदाचे दोन क्षण शोधायचे असतात.... मस्त जगून घ्यायचे. आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणावे, असे ज्ञानेश्वर माउली म्हणतात. परंतु आपण भौतिक साधनांमध्ये सुख शोधतो. घर कितीही मोठे, लहान असू देत पण घरात एक खोली कमीच असते तेच दुःखाचे कारण मानतो.स्वप्न मोठी मोठी पहा पण छोटया छोट्या गोष्टीचा आनंद घ्या. पूर्वी गरिबी होती पैसे नव्हते पण आनंद होता आता तो उरला नाही असे कधी खळखळून हसवीत... ते कधी धीर गंभीर होऊन अंतर्मनात डोकावून पहावयास भाग पडले. जगणे कसे सुंदर होईल हे सोदाहरण देऊन " व्याख्याते गणेश शिंदे आपले विचार मांडले य
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र नांदेडच्या वतीने सचिव शिवाजी गावंडे व सहकाऱ्यांनी प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे " जीवन सुंदर आहे " या विषयावर कुसूम सभागृहात व्याख्यान आयोजित केले होते. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. प्रतिष्ठानचे सचिव शिवाजीराव गावंडे, सदस्य नरसिंग आठवले यांनी प्रमुख व्याख्याते गणेश शिंदे यांचे स्वागत केले.
व्याख्याते गणेश शिंदे यांनी सध्या पद्धतीने जीवन जगण्याचाआनंद कसा आपण हिरावून घेतलाय हे सांगताना लालसा आपण सोडली पाहिजे. आताची पिढी खूप बुद्धिमान आहे; परंतु दुसऱ्याचे ऐकण्यात तिला स्वारस्य नाही. आज लहान मुलांचे डोळे मोबाईलमुळे व्याधीग्रस्त झाले आहेत. आईच्या स्पर्शापेक्षा लहान मूल मोबाईलच्या सान्निध्यात शांत राहते, हा मातृत्वाचा पराजय आहे. आपला ध्येयापर्यंतचा प्रवास जीवनातील लहान सहान गोष्टींचा आनंद घेत पूर्ण झाला पाहिजे. निसर्ग हा आपण देतो त्याच्या कित्येक पटीने आपल्याला परत देत असतो. त्यामुळे ज्या दिवशी आपल्याला मदत करणाऱ्यांच्या यादी पेक्षा आपण मदत केलेल्यांची यादी मोठी होईल तेव्हाच आपले जीवन सुंदर होईल! पैसा जरूर कमवा; पण तो सत्कार्यासाठी खर्च करायला शिका. कला आत्मसात करा.
आपल्या आवडीनिवडीचा शोध घ्या. आयुष्यातील छोट्या गोष्टींचा आनंद घ्या म्हणजे जगणे सुंदर होईल!" दैनंदिन जीवनातील प्रसंग आपल्या नर्म विनोदी शैलीतून कथन करीत शिंदे यांनी श्रोत्यांना हसवत अंतर्मुख केले. "जीवन सुंदर व्हावे यासाठी निश्चित असा कुठलाही फॉर्म्युला नसतो; परंतु आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतला तर जीवन सुंदर होत असते!"
सगळ्यांच्या वाट्याला दुःख आहेत पण दुःखात सुद्धा आनंदाचे दोन क्षण शोधायचे आणि मस्त जगून घ्यायचे. आत्म्याशी जे संबंधित आहे. त्याला सुख म्हणावे, असे ज्ञानेश्वर माउली म्हणतात; परंतु आपण भौतिक साधनांमध्ये सुख शोधतो. घर कितीही मोठे, लहान असू देत पण घरात एक खोली कमीच असते तेच दुःखाचे कारण मानतो.स्वप्न मोठी मोठी पहा पण छोटया छोट्या गोष्टीचा आनंद घ्या. पूर्वी गरिबी होती पैसे नव्हते पण आनंद होता आता तो उरला नाही असे कधी खळखळून हसवीत ते कधी धीर गंभीर होऊन अंतर्मनात डोकावून पहावयास भाग पडणारे जीवन सुंदर आहे हे श्रीगणेश शिंदे यांनी अधोरेखित केले.
विभागीय केंद्र नांदेड चे समन्वयक डॉ प्रा श्रीराम गव्हाणे यांनी प्रास्ताविकात यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने उभे असलेले प्रतिष्ठान हे एक पक्षनिरपेक्ष व्यासपीठ असून येथील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने भरीव काम करीत यशवंतरावांचा विचार तळागाळापर्यंत नेण्यासाठी हे प्रतिष्ठान कार्य करीत असे स्पष्ट केले. सूत्रसंचालन साहित्यिक शिवाजी अंबुलगेकर यांनी तर आभार प्रा संदीप देशमुख यांनी केले तत्पूर्वी पाहुण्यांचा. परिचय प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष कल्पनाताई डोंगळीकर यांनी दिला. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नांदेड केंद्राचे सदस्य व कवी बापू दासरी, डॉ मनोरमा चव्हाण, दिलीप बाळसकर तर प्रतिष्ठाणचे समन्वयक डॉ शुभांगी पाटील, डॉ अनिल देवसरकर, शंतनू कैलासे तसेच भारत होकर्णे, सदा वडजे, विकास कदम, सुधाकर अडकीने, शेख रफिक आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.व्याख्यान ऐकण्यासाठी नांदेडकरांनी तुडुंब गर्दी केली होती सभागृहाच्या बाहेरही एलईडी स्क्रीनवर व्याख्यानाचा लाभ घेतला हे विशेष होय.