पोलीस दलात ८७ मध्ये पोलीस कान्सटेबल या पदावर नियुक्ती झाल्यानंतर ३६ वर्षांचा सेवा काळात विविध पोलीस स्टेशन येथे कार्यरत असतांनाच झेड सुरक्षा अधिकारी यांच्या अधिकारी यांच्या वाहनांवर दहा वर्षे उत्कृष्ट सेवा बजावली आहे. ३१ मार्च रोजी सेवानियमत कालावधी नुसार सेवानिवृत्त झाले, त्यांचा सेवानिवृत्त निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पुरी परिवारातील सदस्य यांच्या भेट वस्तू व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन तथा सुत्रसंचलन सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांनी केले होते, निरोप संभाराचे औचित्य साधून पारंपरिक वाधवृंद ढोलताशांच्या गजरात स्वागत करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी सेवा काळात उत्कृष्ट सेवा करून अविरत सेवा केली असल्याचे सांगितले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात,उपनिरीक्षक आनंद बिचेवार,पाटील ,गणेश होळकर, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक कपाळे यांनी मनोगत व्यक्त करून सेवा काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माहिती दिली व मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास ऊपनिरीक्षक अशोक देशमुख यांच्या सह महिला पोलिस,अंमलदार,चालक, होमगार्ड,पत्रकार यांच्यी उपस्थिती होती. स्वागत व निरोप नंतर ढोल ताशा गजरात निरोप देण्यात आला.