नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता करापोटी गतवर्षीच्या तुलनेत ३१ मार्च २२ अखेर अडीच कोटी रुपये ने वाढ झाली असून ६ कोटी ३३ लक्ष ५१ हजार ११६ रुपये वसुली झाली आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त उपायुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको क्षेत्रीय कार्यालय चे सहाय्यक आयुक्त अविनाश अटकोरे व कार्यालय अधीक्षक विलास गजभारे कर निरीक्षक दिपक पाटील, सुधीर बैस, वसुली लिपीक मारोती सांरग, मालु एनफळे, राजपाल सिंग जक्रीवाले, मारोती चव्हाण, सुखदेव जोंधळे, संतोष भदरगे,संदीप धोंडगे, नथुराम चावरे, राहुल सोनसोळे यांनी प्रशासनाने दिलेल्या उदिष्ट पुर्ण करण्यासाठी जवळपास १५ मालमत्ता जप्त केल्या तर २६ नळकनेकशन कट केले होते.
गतवर्षी ३ कोटी ७८ लाख वसुली होती या वेळेस ६ कोटी ३३ लक्ष ५१ हजार ११६ रुपये ३१ मार्च अखेर केली असून गत वर्षीच्या तुलनेने २ कोटी ५० लाख रुपये जास्त वसुली केली आहे. मालमत्ता धारक जप्ती व नळकनेकशन कट केल्याने व सहाय्यक आयुक्त अविनाश अटकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकाद्वारे मालमत्ता कर व पाणीपट्टी थकबाकी संबंधितांकडून तगादा लावल्याने या वसुली मध्ये वाढ झाली आहे.