ग्रामीण भागात एसटी बसचा प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना विविध बस स्थानकावर तासन तास बसची प्रतीक्षा करीत ताटकळावे थांबावे लागते अनेक ठिकाणी प्रवासी निवारे नसल्याने प्रवाशांना ऊन वारा पावसाचा मारा सहन करीत बसची वाट पहावी लागत होती.
स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, वृद्धांना बसण्यासाठी, महिला व विद्यार्थिंनींना कुठेही उभे किंवा बसण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाच्या वतीने गावोगावी किंवा गावाच्या फाट्यावर " गाव तेथे प्रवासी निवारा " ही संकल्पना उदयास आली. परंतु ते सुद्धा उभारून देण्यास प्रशासनाची उदासीनता दिसून येते . मग त्यावर लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची मात्रा लागली कि, काम लगेच होते. याचाच अनुभव कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना आला . राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असताना प्रशासनाकडून पूर्वीचे प्रवासी निवारे तोडण्यात आले होते .
परंतु रस्ता होऊन बरेच दिवस लोटूनही या ठिकाणी प्रवासी निवारा बांधण्यात आला नाही याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे मागणी करूनही काहीच उपयोग ना झाल्यामुळे शेवटी खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत प्रशासनाला पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर सेलसुरा फाटा येथे कायमचा पक्का प्रवासी निवारा मिळाला याबद्दल सेलसुरा , माळधामणी, सावंगी, रेनापुर,सोडेगाव, टाकळगव्हाण, हिंगणी या गावातील नागरिकांनी खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले आहेत .