कंधार| तालुक्यातील मर्शिवणी येथील एक शेतकरी शेतात जागलीला गेला असता झोपीत असताना अचानक कोणतातरी विषारी साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून खरेप हंगाम जवळ आल्याने अनेक शेतकरी उन्हाळी मशागतीच्या व्यस्त आहेत. दिवसभर कडाक्याचे ऊन असल्याने सकाळी ४ वाजता उठून नागरातही, वखारणीचे कामे केली जात आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना शेतीमध्ये जगातील जावे लागत आहे. अश्याच कामानिमित्ताने कंधार तालुक्यातील मौजे मर्शिवणी येथील मयत युवा शेतकरी परमेश्वर प्रकाश जाधव, वय 19 वर्षे हा दि. 27.04.2022 रोजी शेतातील आखाडयावर झोपण्यास गेला होता.
झोपेत काहीतरी चावल्याने तो घरी येवून आई वडीलांना मला काहीतरी चावले असे सांगित होता. त्यामुळे तातडीने त्यास उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या तयारीत असताना त्याचा मृत्यू झाला. यावरून शेतकरी युवकास कोणतातरी विषारी साप चावुन तो मरण पावला. अशी खबर प्रकाश काशीनाथ जाधव ता. मर्शिवणी जि. नांदेड, यांनी दिल्यावरुन कंधार पोलीस ठाण्यात आ. मृ.11 /2022 कलम 174 सीआरपीसी कायदा प्रमाणे नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोना/2730 टाकरस मो.नं. 9420841070 हे करीत आहेत.