अशोकराव म्हणजे प्रायवेट लिमिटेड काँग्रेस... नागेश पाटील आष्टीकर
पक्षासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यांना संपविण्याचे कार्य अशोकरावांनी केले...
पक्षासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यांना संपविण्याचे कार्य अशोकरावांनी केले...
हिमायतनगर(अनिल मादसवार)काँग्रेस पक्षासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढे जावू न देता आपल्या मागे पुढे करणाऱ्या चमच्यांना अशोकरावांनी मोठे केले. असा घणाघात आरोप शिवसेनेचे युवा नेते तथा हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नागेश पाटील आष्टीकर यांनी केला. ते हिमायतनगर येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते.
१५ वर्ष काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येवून एकहाती सत्ता उपभोगणार्या माजी आ. बापूराव पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र व हदगाव तालुका शिवसेना प्रमुख तथा विधानसभेचे शिवसेनेचे संभावित उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी अशोकराव यांच्या व नांदेड जिल्हा काँग्रेसच्या कर्तुत्वावर ताशेरे ओढले. ते पुढे म्हणाले कि, अशोक चव्हाण यांनी निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय केला. पुढे मागे करणाऱ्या डी.पी.सावंत व अमर राजूरकर यांना मोठे केले. वास्तविक पाहता डी.पी.सावंत व अमर राजूरकर यांनी पक्षासाठी भरीव असे कोणतेही काम केले नाही. काँग्रेस पक्षात त्यांना मानणारा मोठा वर्ग नाही, स्वतंत्र अशी त्यांची कोणती ओट बैंक नाही. केवळ तळवे चाटण्याचे काम करणार्यांना चव्हाणांनी पदावर बसविले. पक्षासाठी अहोरात्र काम करणाऱ्या माझ्या सारख्या कार्यकर्त्यास वेळो - वेळी डावलण्यात आल्यानेच मी चार वर्षापूर्वी " अशोक चव्हाणांच्या प्रायवेट लिमिटेड राजकारणामुळे " काँग्रेसला सोड चिट्ठी दिली असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
अशोकरावांना दोन वेळा मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळाला. परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांना संधीचे सोने करता आले नाही. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत कोणतेही औद्योगिक प्रकल्प अशोकरावांनी जिल्ह्यात आणले नाही. कि कोणतेही शेतीपूरक व्यवसाय उभे करून शेतकर्यांना दिलासा दिला नाही. दोन वेळा मुख्यमंत्री पदी विराजमान होवूनही विकासाचे भरीव काम न करणाऱ्या अशोकरावांवर आता लोक विश्वास ठेवणार नाहीत. स्वर्गीय शंकरराव चव्हाणांच्या विष्णुपुरी प्रकल्पाचाच नेहमी बैण्ड - बाजा वाजून मतांसाठी काँग्रेसची बारात काढण्यात येते. व हरित क्रांती केली असे सांगून मते लाटण्यात येतात. तसेच गुरु ता गद्दीचा निधीही अशोकरावामुळे नाही, तर पंतप्रधान मनमोहनसिंघ यांच्यामुळे मिळाला असून, फुकटचे श्रेय लाटण्याचा अशोकरावांनी प्रयत्न करू नये असा टोलाही त्यांनी लगावला.
नांदेड न्युज लाइव्ह कार्यालयाच्या भेटीत
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
नांदेड न्युज लाइव्ह कार्यालयास भेट देण्यासाठी आले असता उपस्थित झालेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष पांडुरंग गाडगे यांचा शाल श्रीफळ देवून युवा नेते नागेश पाटील आष्टीकर यांनी सत्कार केला. यावेळी सचिव अनिल मादसवार, कार्याध्यक्ष प्रेमकुमार धर्माधिकारी, उपाध्यक्ष दत्ता शिराणे, कोषाध्यक्ष अनिल भोरे, संघटक कानबा पोपलवार, गंगाधर वाघमारे, दिलीप शिंदे, धम्मा मुनेश्वर, संजय कवडे, शिवसैनिक बंडू पाटील, विजय वळसे, रामराव पाटील कोठा, योगेश चिलकावार, संजय चाभरेकर यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.