लोहा| नापिकी व कर्जास कंटाळुन लोहा तालुक्यातील एका शेतकऱयाने आर्थिक विवंचनेतून शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सोनमांजरी गावात शोककळा पसरली आहे. विश्वभंर रामचंद्र लोंढे वय ६० वर्षे असे मयत शेतकऱ्याचे नवा आहे.
मागल्या खरेप हंगामात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची चिंता आणि शेतीच्या कामासाठी बॅकेचे कर्ज घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतात नापिकी झाल्यामुळे घेतलेले कर्जास कंटाळुन मौजे सोनमांजरी शिवार ता. लोहा जि.नांदेड येथील मयत शेतकरी नामे विश्वभंर रामचंद्र लोंढे वय ६० वर्षे यांनी शेतातील बाभळीच्या झाडास पांढर्या रंगाच्या सुताच्या दोरीने गळफास घेवून गळफास घेवून आत्महत्या केली.
हि घटना दिनांक 27 रोजी 06.00 वाजेच्या पुर्वी, घडली असून, घटना लक्षात येताच फिर्यादी संतोष विश्वांभर लोंढे यांनी पोलिसांना माहिती दिली. या घटनेचा पंचनामा करून दिलेल्या खबरीवरुन पोस्टे लोहा येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे कुटुंब निराधार झाले असून, कुटुंबाला शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा अशी मागणी केली जात आहे.