सुभाशिष कामेवार यांचा यशस्वी पाठपुरावा
नांदेड| कंधार तालुक्यातील चिंचोली येथील रहीवासी अजय खानसोळे यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता त्यांना नांदेड येथील यशोसाई हाॅस्पीटल मध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या मेंदुला जबर दुखापत झाली होती.
खानसोळे यांच्या नातेवाईकांनी आ.बालाजी कल्याणकर यांचे शिफारस पत्र घेऊन शिवसेना वैद्यकीय कक्षाचे नांदेड कक्ष प्रमुख सुभाशिष कामेवार यांच्या शी संपर्क करून केला असता तात्काळ सर्व मार्गदर्शन करून आवश्यक कागदपत्रे जोडून मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या शी सुभाशिष कामेवार यांनी संपर्क केला अवघ्या 6 दिवसात मंगेश चिवटे यांनी रूग्णाला 25 हजार रूपयाचा निधी हाॅस्पीटल च्या खात्यावर वर्ग केला या साठी मराठवाडा कक्षप्रमुख दादासाहेब थेटे यांनी ही पाठपुरावा केला. गरजू रुग्णांनी संपर्क करावा असे आवहान सुभाशिष कामेवार यांनी केले आहे.