महीला व दिव्यांगना 'मनःस्ताप ....
हदगाव, शे चाँदपाशा| हदगाव शहरातील राष्ट्रीयकृत बँक की खाजगी बँकेत या दोन्ही ठिकाणच्या बँकेत खातेदारांना शौचालयासह पिण्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारची सोय दिसुन येत नाही. शौचालय अभावी महींलाची कुचंबना होताना दिसुन येत आहे. या व्यतिरिक्त दिव्यांग बांधवानाही अतिशय ञास सहन करावा लागत आहे. जनतेचे लोकप्रतिनिधी त्यांच्या दृष्टीने हि बाब छोटी असली तरी सर्वसामान्य खातेदारांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. शौचालय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन दियावी अशी मागणी केली जात आहे.
हदगाव शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथील उपविभागीय कार्यालय तहसिल पचायत समिती कृषिकार्यालय भुमिअभिलेख कृ.उ बा.समिती महावितरण कार्यालय बस्थानक सह विविध बँका यामुळे हदगाव शहर नेहमी गजबजलेला असतो. या मध्ये विद्यार्थी नागरिक शेतकरी जेष्ठ नागरिकासह दिव्यांग व महीलाचा समावेश असतो. माञ शहरातील विविध बँकाची माहीती घेतली असता खातेदारा करिता कोणत्याही बँकेत पिण्याच्या पाण्याची व शौचालयचा अभाव दिसुन आला आहे.
बँकेत शौचालय थँडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. पण त्याचा उपयोग केवळ बँकेचे अधिकारी व कर्मचारी घेत असल्याचे समजले. माञ खातेदारांना पिण्याच्या पाण्यासाठी हाँटेलचा आधार घ्यावा लागत आहे. तर शौचालय करिता सुलभ शौचालयचा अधार घ्यावा लागत आहे. यामध्ये सर्वाधिक महीलांना ञास सहन करावा लागत आहे. हदगाव नगरपरिषद मध्ये काही ठिकाणी शौचालयाची बाधले ते पण चुकीच्या ठिकाणी केवळ कञाटदाराचे हित जोपसण्यात आले. परिणाम स्वरुप परिसरात घाण दिसुन येत आहे. त्यामुळे शहरातील व पयासरातील सर्व बँकात पिण्याचे पाण्याची व्यवस्था व शौचालय खुले करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
घोटभर पाण्यासाठी हाँटेलात जाव लागत - हदगाव शहरात सर्व बँकात शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने महीलाना शालेय काँलेज विद्यार्थ्यांची कुचंबना तर होत आहे. त्यांना तहान भागविण्यासाठी हाँटेलचा सहारा घ्यावा लागत आहे. अस शहरातील जेष्ठ काँम्रेड तथा पञकार श्याम लाहोटी यांनी सागितले ते पुढे म्हणाले की यापेक्षाही शासकीय कार्यालय मध्ये पण मुलभुत सुविधाचा अभाव आहे. बहुतांशी ठिकाणी शौचालय व पिण्याच्या पाण्याची नितांत गरज आहे. या बाबतीत संबंधित विभागाच्या अधिका-यानी लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.