कपड्याबरोबर आलेले पैसे केले परत
अर्धापूर, निळकंठ मदने| येथील बसस्थानक परिसरात मारोती मुधळ यांच्याकडे ग्राहकांचे आलेल्या इस्त्रीसाठी कपड्यात ४२०० रुपये आले असता,ते पैसे त्या ग्राहकाला बोलावून परत केले,मुधळे यांनी ग्राहकांचे पैसे परत करण्याची ही तिसरी वेळ असल्याने अर्धापूर चे न्यायाधीश यांनी न्यायालयात मारोती मुळे यांचा सत्कार केला.
अर्धापूरात बसस्थानक परिसरात मारोती मुधळे यांचे ईस्त्रीचा गाड्यांवर दुकान आहे. मारोती मुधळे यांच्या दुकानावर शंकर नागरी बॅंकेचे शिपाई अशोक गवळी रा.फुलेनगर अर्धापूर यांनी इस्त्रीसाठी कपडे टाकून नेहमीप्रमाणे घराकडे गेले. इस्त्री करतांना गवळी यांच्या पॅण्ट मध्ये ४२०० रुपये आढळून आले. त्यामुळे गवळी यांना भ्रमणध्वनीवर ही माहिती सांगून बोलावून ही रक्कम मुळे यांनी परत केली.
शिपाई अशोक गवळी हे ही अत्यंत शांत स्वभावाचे व आर्थिकदृष्ट्या गरीब परीस्थीत जीवन जगणारे व्यक्तीमत्व असल्याने यावेळी त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. या घटनेची माहिती अर्धापूर न्यायालयाचे दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम डी बीरहारी यांनी ईमानदार ईस्त्री चालकाचा शाल, हार,पेढा भरवून सत्कार केला.
यावेळी प्रमुख पाहुणे मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष निळकंठ मदने व पत्रकार सखाराम क्षीरसागर हे होते. याप्रसंगी न्यायमुर्ती एम डी बिरहारी म्हणाले कि,ईमानदार व प्रमाणीक इस्त्री चालक मारोती मुधळे यांनाही नगरपंचायतने गाळे उपलब्ध करून देऊन प्रोत्साहित करावे. अशा प्रकारे एक काम करणारा प्रामाणिक,गरीब मुधळे यांचा आदर्श घेऊन सर्वांनी ईमानदारीने वागण्याची खरी गरज असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी अशोक गवळी यांची उपस्थिती होती.या घटनेची तालुक्यात सर्वत्र चर्चा होती.