वॉर्ड क्रमांक १२ तील विकासकामासाठी आ.जवळगावकरानीं दिला १० लक्ष रुपयाचा निधी - संजय माने -NNL


हिमायतनगर,अनिल नाईक| शहरासह तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ.माधवराव पाटील जवळगावकर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून अविरतपणे विकास कार्य करत आहेत. नुकतेच शहरातील विविध विकास कामासाठी ३ कोटी निधी उपलब्ध झाला, त्याच बरोबर त्यांनी वॉर्ड क्रमांक १२ साठी १० लक्ष दिले आहेत. त्यातूनच नालीच्या बांधकामाला नुकतीच सुरुवात झाली असल्याची माहिती  काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक संजय माने यांनी दिली.      

हिमायतनगर शहरातील वॉर्ड क्रमांक १२ मध्ये अनेक वर्षपासून नाल्याचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे येथील नागरिकांना घाणीच्या साम्राज्यात दिवस काढावे लागत होते. याबाबत आमच्या वॉर्डातील लोकांच्या आग्रहामुळे मी शहराध्यक्ष या नात्याने आ.जवळगावकर साहेबाकडे या भागातील नाल्यासह रस्त्याच्या बाबतीत प्रश्न मांडून निधी देण्याची मागणी केली होती. मागील काळात डॉ रावते ते स्व.ग्यानबाराव माने यांच्या घरापर्यंत १२ क्रमांक वॉर्डात शांतीलाल सेठ व माझ्या आग्रहामुळे निवडून येताच आ.जवळगावकर यांनी १० लक्ष रुपयाचा निधी देऊन प्रसिद्ध ठेकेदार सुरेश पळशीकर यांनी दर्जेदार सिमेंट काँक्रेट रस्ता करून दिला. 

यापूर्वी देखील आमदार महोदयांनी ७ लक्ष नालीसाठी दिले होते ते काम मागील डिसेंबर महिन्यात करण्यात आले. त्यानंतर थोडं नालीचे काम राहिले त्यासाठी नुकतेच १० लक्ष दिले आहेत. त्या निधीतूनही कामाला नुकतीच सुरूवात झाली असल्यामुळे जनतेतून आमदार माधवराव पाटील जवळगाववकर यांनी येथील सर्वात महत्वाचा नालीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्या बाबदद्ल आभार मानले जात आहे. यानंतर देखील वॉर्डातील समस्या सोडविण्यासाठी आमदार जवळगावकर नेहमीच अग्रेसर राहतील असा मला विश्वास असल्याचेही काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक संजय माने यांनी सांगितले. यावेळी सोसायटीचे संचालक सुभाष शिंदे, अनंतराव देवकते, माधव पाळजकर, पंडित ढोणे, लक्ष्मण हरडपकर, लालूं चव्हाण, वैभव शिंदे, अरविंद वानखेडे, किरण माने, आदींसह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.   


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी