उस्माननगर, माणिक भिसे| लहान पेनूर ता.पुर्णा जि.परभणी येथील भूमिपुत्र आणि ह.मु.उस्तमाननगर येथील बहुजन चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते चांदोबा लोकडे पेनूरकर यांचे बंधू सध्या कोरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या डी.पी.भोसले महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डाॅ. भगवान लोकडे यांना नागपुर येथे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या आठव्या वर्धापन दिनाच्या भव्य कार्यक्रमात भंते नागार्जुन सुरूई व डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांच्या शुभहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ.भगवान लोकडे हे छोट्याशा गावातील असून एका गरीब कुटुंबातील , जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर अभ्यास करून ध्येय सफल केले.लहान पणापासून आभ्यासाची आवड , विविध स्पर्धापरीक्षा देवुन परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणून खचून न जाता जिद्दीने व आत्मविश्वासाने पुढे येवून परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. आई, वडील,काका, मोठ्या भावाचे मार्गदर्शन घेत प्रा.डाॅ. भगवान लोकडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यावर पी.एचडी संपादन केली.अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिका मधून संशोधन लेख प्रकाशित केलेले आहेत.
प्रा.डाॅ.भगवान लोकडे यांच्या संशोधन लेख,पत्रिकेची नागपूर येथील जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने दखल घेऊन त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.यावेळी महामंडळाचे अध्यक्ष प्रा.दीपककुमार खोब्रागडे , कार्यध्यक्ष डॉ. गोविंदराव कांबळे, अदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. भगवान लोकडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल उत्तमराव भिसे, पुंडलिक दाढेल,प्रा.विजय भिसे, पत्रकार शिवराज दाढेल,डॉ.ज्ञानेश्वर लोकडे, दिगंबर वाघमारे,बालाजी लोकडे,लक्ष्मिकांत उत्तम भिसे, चांदोबा लोकडे पेनूरकर, पत्रकार लक्ष्मण कांबळे, पत्रकार संघाचे सहसचिव माणिक भिसे, सचिन लोकडे पेनूरकर,सुमित पेनुरकर, यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.