उस्माननगर, माणिक भिसे| कै. मथुराबाई पंडीतराव गायकवाड ( चिखलीकर) यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त संकल्प व वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय चिखली ता.कंधार येथे दि.९ एप्रिल शनिवारी सकाळी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, प.पु.रतनपुरी महाराज मठ संस्थान चिखली हे राहाणार असून कार्यक्रमाचे उद्घघाटक मा.प्रविण पा.चिखलीकर ( सरचिटणीस, जिल्हा भा.ज.पा.तथा सदस्य जि.प.सदस्य नांदेड) सचिन पा.चिखलीकर (मा.सरपंच चिखली) श्रीमती ललिताबाई चिखलीकर ( चेअरमन) यांच्या हस्ते होणार आहे. तर मार्गदर्शक म्हणून मांगीलाल रामा राठोड पुसदकर ( अध्यक्ष) , मनोहर रामराव चव्हाण,( सचिव) बंडू मदेवाड ( गुरु ऑप्टीकल ) हे मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमाला सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर ( प्रदेश उपाध्यक्ष महीला मोर्चा भाजपा, तथा जि.प.सदस्या) साहेबराव पोटफेडे ( सरपंच) अच्युत पवळे (उपसरपंच) , नागनाथ कुरुंदे, शंकरराव चव्हाण, श्रीकांत राठोड,प्रमोद बोरसे,पठाण अयुब,गोतम सुर्यवंशी,राजू सोनकांबळे, गजानन गिरी, यांच्यासह संस्थेचे कर्मचारी व गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित राहणार आहेत.
आरोग्य शिबीरास डॉ.पंकज देशमुख ( नेत्ररोग तज्ज्ञ ) डॉ.संदीप शुक्करवार ( दंत व मुखरोग तज्ञ ) , डॉ.सुरज एस.डांगे ( जनरल फिजीशीयल ॲड संर्जन) हे उपस्थित राहून रुग्णांना तपासणी करून मार्गदर्शन आहेत. डॉक्टर तपासणी फ्री व अल्पदरात चष्मा देण्यात येणार आहे तरी या शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आयोजक उत्तमराव पा.पंडितराव गायकवाड,राजु पा.गायकवाड ,दगडू पा.बापुराव गायकवाड यांनी केले आहे.