नांदेड। डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त जिल्हाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 14 एप्रिल रोजी दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेची कार्यशाळा घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती.
यावेळी सरपंच प्रतिनिधी मोहनराव जोगेवार, समाज कल्याण निरीक्षक कैलास मोरे, रमेश नागुलवार विविध सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी, लाभार्थ्यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेत समाज कल्याण निरीक्षक कैलास मोरे यांनी योजनेबाबत माहिती देवून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेची लाभ घेतलेल्या लाभार्थी हणमंते परबत, रामदास ननुरे, श्रीमती धोंडाबाई सुर्यवंशी, श्रीमती सारजाबाई सुर्यवंशी, पुंडलीक आढाव यांनी मनोगत व्यक्त केले.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेमुळे आम्ही स्वाभिमानाने जगत आहोत असेही त्यांनी सांगितले. मोहनराव जोगेवार यांनी घुंगराळा गावातील लोकांनी समाज कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन कैलास मोरे तर आभार रमेश नागुलवार यांनी मानले.