नांदेड| एप्रिल महिन्याच्या ३ तारखेपासून मुस्लिम समाजातील पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. रमजान महिन्यात धार्मिक पूजा पाठ आणि उपवास यास अनन्य साधारण असे महत्व असते. या अनुषंगाने मुजामपेठ येथील ग्रामपंचायत सदस्य रफी अहमद यांच्या तर्फे सामूहिक इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
या इफ्तार पार्टी साठी नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, शासकीय गुत्तेदार साजिद काझी, यांची प्रमुख उपस्थिती, फारुख भाई, गफूर बिलाल, मुख्तार भाई, तातेराव ढवळे, राजेश बो तलवार, शिवाजी बुचडे, गोपीचंद पाटील, झाकेर भाई, मुजीब भाई, शेख उस्मान, मोहम्मद खाजा सर उपस्थित होते. त्याचबरोबर मुजामपेठ येथील नागरिक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून भोजनदान देऊन सामाजिक सलोख्याचे दर्शन रफी अहमद यांनी घडवले.