एटीएमचे ३१ लाखाचा ऐवज लुटणाऱ्या ३ आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी -NNL


अर्धापूर, निळकंठ मदने|
बसवेश्वर चौकातील एसबीआय बैन्केचे एटिएम फोडून चोरट्यांनी ३१ लाख रुपये घेऊन पसार झाले होते. या प्रकरणी परराज्यातील तिघांना अर्धापूर पोलीसांनी अटक केली होती. त्या तिघांना न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौकात एसबीआय बँकेचे एटीएम मुख्य रस्त्यावर असुन. दि.२९ जुलै २१ सकाळी चारच्या सुमारास चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने पंधरा मिनिटांत एटीएममधील ३१ लाख ७ हजार रुपयांची रक्कम घेऊन पसार झाले.या प्रकरणी आर्धपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल नऊ महिन्यांनी एटीएम चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

गॅस कटरच्या सहाय्याने चोरी करणारी परप्रांतीय टोळीतील हरियाणा राज्यातील इर्शाद आसमोहम्मद मेवाती वय ३६ वर्षे राहणार बुराका थाना हथिन जि. पलवल हरियाणा, सलीम हसन मोहम्मद वय २६ राहणार मेवाती जुना मोहल्ला जवळ गाव उटावड ठाणा उटावडा तहसील जि पलवल राज्य हरियाणा, मुस्ताक इस्लाम मेवाती वय ४३ राहणार अंधाका ठाणा नुहसदर ता.जि.नुह राज्य हरियाणा हे असुन सिआर नं १६७/२१ कलम ४५७,३८० भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी महम्मद तय्यब,सतिष लहानकर,संदिप पाटील, कल्याण पांडे, महेंद्र डांगे यांनी आरोपींना मध्यप्रदेश येथुन अटक केली आहे.या गुन्ह्यातील आरोपींना तिन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी राजेश घुन्नर,चाटे, रामराव घुले हे तपासकार्यात मदत करत आहेत.


                                      

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी