हदगाव, शे चांदपाशा| नादेड येथील प्रसिद्ध बाधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते यांची दिवसा बंदुकीच्या गोळ्याने हत्या करण्यात आली. त्या ख-या हल्लेखोरांना त्वरित पकडुन कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनद्वरे हदगाव शहरातील माहेश्वरी सभा तालुका अध्यक्षद्वरे करण्यात आली आहे.
त्यांनी दि ६ एप्रिल २०२२ ला दिलेल्या निवेदनात तहसिलदार तथा दडाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.५ एप्रिल २०२२ रोजी भर दिवसा नादेड शहरातील गजबजलेल्या भागात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या घरासमोर हल्लेखोर बंदुकीच्या गोळ्या घालुन हत्या करुन आरामाने पळुन जातात. या घटनेमुळे भितीचे वातावरण निर्माण झालेले असुन, समस्त माहेश्वरी समाजातच नव्हे तर व्यापारी जगताच्या मणावर खुप मोठ्या प्रमाणात माणसिक अघात झालेल आहे.
त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झालेली आहे. या घटनेची किती ही निंदा केली तरी ती कमीच आहे. पोलिसांनी या घटनेच्या ख-या हल्लेखोरांनाशोधून त्यांना कडक शासन करावे व स्व. संजय बियाणीच्या परिवाराला न्याय मिळवून दियावा अशी मागणी ही दिलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे. या निवेदनावर गणेश सारडा, माहेश्वरी सभा तालुका अध्यक्ष अँड सुमित तोष्णीवाल, माहेश्वरी सभा युवा ता. अध्यक्ष सौ.निर्मला काबरा, माहेश्वरी महीला मंडळ तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.