आदिवासी समाज बांधवांच्या वतीने आ. डॉ.राठोड यांचा जंगी ए सत्कार समारंभाचे आयोजन -NNL

जात वैधता प्रमाणपत्रासाठी आडवणुक करणाऱ्यां जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी सह - संचालक दिनकर पावरा यांची तडकाफडकी ठाणे येथे बदली केल्या बद्दल आदिवासी समाज बांधवांच्या वतीने जंगी सत्कारांचे दि.९ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री अशोकराव गजलवाड आदिवासी कोळी महासंघ ता.अध्यक्ष मुखेड यांनी दिली.
मुखेड, रणजित जामखेडकर। महादेव कोळी, मल्हार कोळी, आदिवासी मुन्नेरवारलु समाजाच्या अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्रासाठी वेळोवेळी प्रयत्न करणारे व अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून जात वैधता प्रमाणपत्र देण्यास जाणीवपूर्वक आडवणुक निर्माण करणाऱ्या सह-आयुक्त दिनकर पावरा यांची तकापडकी बदली करण्यास भाग पाडल्या बद्दल आ. डाॅ. तुषार राठोड यांचा मुखेड तालुक्यातील आदिवासी महादेव कोळी समाज व आदिवासी मुन्नेरवारलू समाजाच्या वतीने जाहीर जंगी स्वागत सत्काराचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.

 महादेव कोळी, मल्हार कोळी, आदिवासी मुन्नेरवारलु समाजाच्या अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र विषयी मुखेड- कंधार विधानसभेचॆ आमदार डाॅ. तुषार राठोड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून जात वैधता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आदिवासी जात पडताळनी समिती औरंगाबाद विभागाचे सह आयुक्त यांची आठ दिवसात बदली करण्यास राज्य शासनास भाग पाडले तसेच आदिवासी कोळी, मुन्नेरवारलू समाजाचा ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्न केल्याबद्दल आदिवासी कोळी समाज व आदिवासी मुन्नेरवारलू समाज बांधवाच्या वतीने दि. ९ एप्रिल २०२२ रोजी शहरातील वाल्मिक नगर येथे जाहीर आभार व सत्काराचे आयोजन करण्यात आले असून समाज बांधवाने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे.

असे अवाहन माजी मुख्याध्यापक व मुन्नेरवारलू समाजाचे जेष्ठ नेते वसंतराव नाईनवाड, वसंत संबुटवाड, बालाजी लिंगनवाड, पंचायत समितीचे माजी उपसभापती मारोती मामा फसकुलवाड, अशोक गजलवाड, डाॅ. बालाजी गुडमेवाड, डाॅ. विरभद्र लंगेवाड, व्यंकटेश संबुटवाड, नागनाथ लोखंडे, हनमंत नारनाळीकर, शिवा मुद्देवाड, व्यंकट गंदपवाड, प्रा.कंचेवाड, शंकर नाईनवाड, संजय नाईनवाड, शिवाजी बोंनलेवाड, राजु गंदपवाड, माधव तोटावार, राजु गुडमेवाड, विलास गडमवाड, सरपंच विष्णु तोटेवाड, भीम पैलवान . वेंकट संमराळे .मारोती घालेवाड, चंद्रकांत गुडमेवाड, सतीश गुडमेवाड. वैजनाथ लोखंडे. शिवाजी समराले.शिवाजी दारेवाड. मनोज गंदपवाड, आदिसह आदिवासी कोळी महादेव व आदिवासी मुन्नेरवारलू समाज बांधवाने केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी