नांदेड| मालेगाव येथील ग्रामसेवक संजय निलमवार यांनी ग्राम सचिवालयाच्या गाळे लिलाव प्रक्रियेत पक्षपातीपना करत लिलावाची रक्कम कार्यालयात हजर न राहुन स्विकारली नाही. आणी पुर्विच्याच गाळे धारकांना गाळे देन्याचा प्रयत्न केला आहे. अश्या प्रकारे कर्तव्यात कसूर करणार्या ग्रामसेवक निलमवार यांना तात्काळ निलंबित करून ग्रामपंचायतची पुर्ण चौकशी करावी. अशी मागणी बेरोजगार संघर्ष समीती चे अध्यक्ष सुभाशिष कामेवार यांनी केली आहे.
तसेच गेल्या वीस वर्षांपासून अनेक गाळे धारकांनी पोट भाडे करू ठेऊन लाखो रुपयाचे शासनाचे नुकसान केले आहे. त्यामुळे सर्व मूळ गाळे धारकांवर शासनाची फसवनुक केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे. शासनाचा बुडालेला महसुल गाळे धारकांकडून वसुल करावा. तसेच लिलावाची प्रक्रिया पुन्हा पारदर्शक पद्धतीने राबवावी.
ग्रामसेवकाला पाठीशी घालणाऱ्या सरपंच अनिल ईंगोले याच्यावर ही कार्यवाही करावी. अशी मागणी उपोषणकर्यांनी केली आहे. यावेळी अध्यक्ष सुभाशिष कामेवार, देवानंद वाघमारे, बबलु तिम्मेवार, मारोती ईंगोले, ओमप्रकाश बुट्टे, अर्जुन गायकवाड,वर्षा कुलकर्णी, माधव स्वामी, दशरथ स्वामी, अमोल सावंत, शशिकांत सावंत, गजानन चंदेवार आदींची उपस्थिती होती.