दारूबंदीचा लढा तीव्र करण्यासाठी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी महिलेची वर्णी

सरसम(साईनाथ धोबे)हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील महिलांनी दारू पुरवठा करणार्यांना पकडून धिंड काढून पोलिसांच्या हवाली केले. परंतु केवळ कार्यवाही करून मोकळे सॊडल्याने सरसम गावातील दारूविक्रीचा धंदा सुरूच होता. या प्रकाराला कंटाळलेल्या सरसम येथील महिलांचा पुढाकारातून ग्रामसभेत एकजूट दाखविली आणि. तीन वर्षानंतर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सिमाबाई गाेखले या महिलेची निवड करून सत्ताधार्यांना जोरदार चपराक दिली आहे.
तालुक्यातील मौजे सरसम बु येथे अवैध्य देशी दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ माजविला असून, यावर अंकुश मिळविण्यासाठी येथील महिलांचा गेल्या सात वर्षांपासून एल्गार सुरु आहे. प्रथमतः नांदेड मनसेच्या महिला कार्यकर्ती सुरेखा पाटील यांच्या माध्यमातून सरसम इंदिरा नगर येथील दारू विक्रेत्याच्या घरावर छापा मारून कार्यवाही करण्यात अली होती. त्यानंतर काही दिवस हा प्रकार बंद झाला, महिन्याने दारू विक्रीचा गोरखधंदा पूर्ववत सुरु झाला. अनेक निवेदने आंदोलन करूनही स्थानिक पोलीस प्रशासन, सरपंच नेते, पोलीस पाटील, तत्कालीन तंटामुक्त समितीचे अध्यक्षांच्या संगनमताने दारू विक्री करणार्यांना अभय दिले जात असल्याने दारू बंद झालीचा नाही. या प्रकारास कंटाळून 24 ऑगस्ट 2012 साली येथील महिलांनी पुढाकार घेऊन जिल्हयात पहिल्यांदा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी कलावंतीबाई परसराम वडपत्रे यांची निवड केली. त्यांच्या निवडीने दारू विकर्त्यानी गाशा गुंडाळला, जवळपास दोन वर्ष गावातील दारूविक्रेते हैराण झाले होते. त्यांनतर राजकीय खेळी झाल्याने तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद पुरुषाकडे गेले, आणि या गावात दारूचा महापूर पुन्हा वाहू लागला. त्यानंतर येथील काही राजकीय पुढार्यांनी आपल्या अधिकाराने पोलिसांवर दबाव आणून परस्पर अध्यक्ष निवडून आपला मनमानी कारभार केला. त्यामुळे गावात दारूबरोबर अनेक धंदे सुरु झाल्याने नवतरुण युवक व्यसनाच्या आहारी गेले, दारूचा महापूर वाहू लागल्याने गोर गरीब, शेतकरी, मजुरदारांच्या महिलांना दारुड्या पतिराजाचा उपद्व्याप निमूटपणे सहन करावा लागतात होता.

तत्कालीन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अतुल वानखेडे यांच्या पुढाकारातून महिलांच्या शिस्टमंडळांनी पोलिसांना दारूबंदीचे निवेदन दिले. परंतु शुल्लक कार्यवाही करून त्या विक्रेत्यांना सोडून देण्यात आले होते. त्यानंतर दि.11 ऑगस्ट रोजी महिलांनी दारूपुरवठा करणार्यांना पकडून चोप देऊन धिंड काढली, तरीसुद्धा गावातील दारू विक्री काही बंद झाली नाही. त्यामुळे सरसम येथील महिलांनी 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत दारूबंदीसाठी अध्यक्ष बदलण्याची मागणी केली. परंतु सत्ताधारी व विरोधकांनी सुचविलेल्या नावावर शिक्का मोर्तब झाला नसल्याने ग्रामसभा तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर दि.23 मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत सततधारी विरिओढकाच्या खडाजंगी नंतर अखेर माजी सरपंच सुनील वानखेडे यांच्या गटाला तंटामुक्त अध्यक्ष निवडीसाठी यश आले. आणि अखेर महात्मा गांधी तटामुक्त समिती अध्यक्षपदी सिमाबाई गंगाधर गाेखले यांची निवड झाली आहे. ग्रामपंचायत मध्ये झालेल्या ग्रामसभेत माेठ्या संख्येने नागरिक व महिला मंडळींनी उपस्थिती लावून बिनविराेध निवड केल्याने सत्ताधारी गटाच्या चारी मुंड्या चित्त झाल्या आहेत. येथील तंटा मुक्त समितीच्या अध्यक्ष निवडीसाठीची निवडणूक एकहाती सतत मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप देशमुख यांना हि ग्रामसभा माेठ्या प्रतिष्ठीचे केली हाेती. परंतु यात त्यांना महिलांच्या एकजुटीमुळे अपयशाला सामोरे जावे लागल्याची चर्चा गावात सुरु आहे. या निवडीसाठी सखाराम मंडलवाड, रवि दमकोंडवार, पञकार साईनाथ घोबे, साईनाथ शिंदे, मोहन गायकवाड, प्रकाश गायकवाड, शांतवन गोखले, देविदास मंडलवाड, डॉ सारीपुञ गोखले, मधुकर पांचाळ, रमाकांत दमकोंडवार आणि शेकडो  सरसम वाशी गावकरी, महिला पुरुष मंडळानी सहकार्य केले. 

बैठकीच्या वेळी अध्यक्षपदासाठी पुरुषांचीच नाव सुचविण्यात आले परंतु महिलांची एकजूट व तत्कालीन तंटामुक्त अध्यक्ष अँड. अतुल वानखेडे यांनी सुचविलेल्या नावावर अखेरशिक्का मोर्तब झाला. एका सुशिक्षित व दारूबंदीच्या विरोधात कार्य करणाऱ्या धाडसी महिलेची निवड करण्यात आली. त्यामुळे  आगामी काळात गावातील दारू विक्रीला लगाम लागेल अशी रास्त आपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी