नांदेड, आनंदा बोकारे| नांदेड जिल्ह्यात आगामी होणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होणार असल्याने इच्छूक उमदेवारांनी आपआपली मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. भोकर विधानसभा मतदार संघातील माळकौठा सर्कल मधून इच्छूक रत्नाकर शिंदे रोहीपिंपळगावकर, माणिकराव जाधव माळकौठा, मारोती किरकन संगतिर्थकर व सुभाष देशमुख चिकाळेकर हे प्रभारी दावेदार समजल्या जात असून निष्ठावंत व कामाची दखल घेतल्यास सुभाष देशमुख चिकाळेरक यांचेच पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.
माळकौठा सर्कल, रोहीपिंपळगाव सर्कलमध्ये माणिकराव जाधव व रत्नाकर शिंदे या दोघांपैकी जिल्हा परिषद सदस्यासाठी एकाची वर्णी लागण्याची शक्यता काँग्रेस वर्तुळात आहे. रोहिपिंपळगाव गणातून पंचायत समितीसाठी निष्ठावंत असणारे सुभाष देशमुख चिकाळेकर यांना संधी मिळू शकते. नवीन मोंढा येथील रक्तदान शिबीराच्या प्रसंगी बोलताना साहेबांनी युवक काँग्रेस व निष्ठावंत कायकर्त्याला 50 टक्के वाटा निवडणुकीत देण्याचा विचार करण्याचे सुतोवाच केल्याने निष्ठावंत असलेल्या देशमुखांचे चांगभले होण्याची शक्यता आहे.
एका सामान्य कुटूंबात जन्म घेतलेल्या सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून काँग्रेस व चव्हाण घराणे यांच्याशी एकनिष्ठ राहून कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्ष वाढविणे, स्वखर्चातून विविध सामाजीक उपक्रम राबवणे, राजकारण बाजुला ठेवून जनतेसाठी व त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी समाजकारण करण्याचे काम केले आहे. त्यांच्या कामाची दखल काँग्रेस नेतृत्वाने वेळोवेळी घेवून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सौ.अमिताभाभी चव्हाण, माजी मंत्री डी.पी.सावंत, आ.अमरनाथ राजूरकर यांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुकही केले आहे. अशोकराव चव्हाण साहेबांच्या विजयासाठी त्यांनी संपूर्ण भोकर मतदार संघ अक्षरशः पिंजून काढला होता. घरोघरी जावून काँग्रेसचे विचार पोहोचविण्याचे कार्य केले होते.
पुढे-पुढे न करता, चमकोगिरी न करता सामाजीक उपक्रम राबवून कामाचा ठसा उमटवला आहे. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या सुभाष देशमुख चिकाळेकर यांना यंदाची जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती गाठण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतल्याचे सध्या दिसून येत आहे. पक्षाचे जबाबदारी दिल्यास त्यास खरे उतरण्याचा विश्वास सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी बोलून दाखविला आहे.