मुंबई| राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवार हाय - हाय अशा घोषणा देत शरद पवार यांच्या सिल्लर ओक या मुंबईतील घरावर संतप्त एसटी कर्मचाऱ्यांच्या जमावाने अचानक हल्ला केला.
आंदोलकांनी चपला, दगडांचा घरावर वर्षाव केला असून, या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घराकडे धाव घेत आंदोलकांशी प्रत्यक्ष चर्चा करीत हात जोडून विनंती केली आहे. ही घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. आंदोलक अचानक हल्लाबोल करतात आणि पोलीस व गुप्तचर यंत्रणांना याची माहिती नसते याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. आंदोलकांचा जमा आल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी येथे धाव घेऊन आंदोलकांना थांबून समजूत घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
शासनाने आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या अद्याप पुर्ण केल्या नाही. महाविकास आघाडी सरकारचे शरद पवार आमच्याकडे बघायला तयार नाही. आमच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या मृत्यूला शरद पवार जबाबदार आहेत, अजित पवारही जबाबदार आहेत. एसटी कर्मचारी शहिद झाले आहेत. अश्या शब्दात आरोप करत या आंदोलकांनी हल्लाबोल केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असल्याचे अचानक झालेल्या आंदोलनावरून दिसते आहे.
जोपर्यंत आम्ही शांत पाहू.. तोपर्यंत शांत जेव्हा गांधिगीरी सोडली तेव्हा मात्र आम्ही शरद पवारांना पळता भुई करावे लागेल. असे म्हणत काही आंदोलकांनी निवासस्थानात घूसून शरद पवार यांच्या विरोधात आंदोलन करत संताप व्यक्त केला आहे.