एकंबा कानिफनाथ यात्रेतील "बळीप्रथा" बंद; न्यायालयाच्या आदेशाचे ८ वर्षांपासून होतेय पालन -NNL

कान्होबाची काठीची मिरवणूक काढून उत्सव साजरा करण्याची परंपरा कायम


नांदेड, अनिल मादसवार|
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथून जवळच असलेल्या मौजे एकंबा येथे दरवर्षीप्रमाणे भरणाऱ्या कानोबा (कानिफनाथ) यात्रेत भाविकांकडून हजारो बकर्याचा बळी देण्याची प्रथा होती. हि प्रथा बंद करण्यासाठी येथील वारकरी संप्रदायाचे हभप. प्रभू महाराज पिटलेवाड यांनी लढा दिला. त्यांच्या लढ्याला १२ वर्षानंतर म्हणजे मंगळवार दि.११ मार्च २०१४ साली यश आले. तेंव्हापासून येथील यात्रेत फाल्गुन दशमीला दिल्या जाणारी बळी प्रथा न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आली आहे. तेंव्हापासून गावकरी देखील न्यायालयाचे आदेशाचे पालन करत असून, परंपरेनुसार कान्होबाची काठीची मिरवणूक काढून उत्सव साजरा करण्याची परंपरा आजही गावकरी जोपासत आहेत. यंदा दि. दि.१३ मार्च रोजी एकंबा येथे उत्सव साजरा होणार आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथे दरवर्षी फाल्गुन दशमीच्या दिवशी नवनाथांपैकी एक असलेल्या कानोबा (कानिफनाथ) महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहाने भरविण्यात येते. कानिफनाथ महाराजाने आपल्या सातशे शिष्यांसह धर्मप्रचाराचे काम निजामी राजवटीत केल्याच्या आख्याईका काही बुजुर्ग व्यक्तींकडून सांगण्यात येतात. औरंगजेबाच्या काळात येथे महसूल वसुलीसाठी येणाऱ्या तत्कालीन राजवटीतील अधिकार्यांना खुश करण्यासाठी बकऱ्याचा बळी देवून त्यास मेजवानी देण्याची प्रथा होती अशी दंतकथा या बळीप्रथेच्या संदर्भात सांगितली जाते. कालांतराने तीच प्रथा कायम होऊन दशमीच्या दिवशी यात्रेत कानिफनाथ मंदिरासमोर काही भाविकांकडून बकऱ्यांचा बळी देण्याची प्रथा रूढ झाली. 


परंतु १९७० च्या नंतर त्याचे स्वरूप बदलले आणि यात्रेत हजारांवर बकऱ्यांचा बळी देण्याचा परिपाठ सुरु झाला. अंदाजित १९७० साली येथे १५ बकऱ्यांचा बळी देण्यात आला. २००३ साली हाच आकडा ८० वर पोहोचला. तर २०१० साली याची संख्या १२० झाली दर वर्षी बकऱ्यांचा बळी देण्याच्या संखेत झपाट्याने वाढ होऊन हजारो बकर्यांचे शिरच्छेद करून त्यांचा बळी चढविल्या जात होता. तसेच मृत बकर्याचे शव हे दोघे जन धरून मंदिरापासून ते गावातील रस्त्यावरून घरी नेले जात होते. त्यामुळे बकर्याच्या मासाचे तुकडे व रक्ताचे थेंब पडत असल्याने हे भयावह दृश्य पाहणार्यांचे मन विच्छिन करणारे दिसत होते. त्यामुळे चिमुकल्या बालकांना भीती तर माळकरी व भक्त गणांना किसळवाणे दिसत होते. 

हा प्रकार सहन न झाल्यामुळे काही वारकरी संप्रदायातील महिला - पुरुष मंडळीना खटकली. आणि त्यांनी या बळी प्रथेला २००२ मध्ये ग्रामपंचायतने ठराव दिला. मात्र यात काही लोकांनी सहकार्य मिळाले नसल्याने त्यांना यश आले नाही. तेंव्हापासून काहींनी प्रभू महाराज पिटलेवाड यांच्या नेतृत्वाखाली विरोध करण्यास सुरुवात केली. हजारो बकर्यांचा बळी त्यांच्या रक्त मासांचा चिखल हे वारकर्यांना बघावेनासे झाले. म्हणून त्यांनी हि प्रथा कायमची बंद करण्यासाठी तीव्र लढा उभा केला. आपलं कोणीच ऐकत नसल्याने शेवटी प्रभू महादजी पिटलेवाड या वारकर्याने ३१ जानेवारी २०१४ ला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड पिठात पुराव्यानिशी याचिका दाखल केली होती. सबळ पुरावे लक्षात घेत दि.१० मार्च २०१४ रोजी मौजे एकंबा येथील दिल्या जाणाऱ्या बळी प्रथा बंद करण्याचा आदेश आर.एम.बोरडे आणि ए.एम.बदर यांच्या खंड पीठाने दिला. या कामी विधी तज्ञ मुकेश गोयंका यांनी बाजू मांडली होती.    

हि अघोरी प्रथा बंध करण्यासाठी न्यायालीन लढा लढणारे प्रभू महाराज पिटलेवाड यांनी न्यालयाच्या आदेशाचे स्वागत करीत दीर्घ कालीन लढलेल्या लढ्यास यश मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. या दीर्घ स्वरूपाच्या न्यायालीन व न्यायालयाबाहेरील लढा उभे करण्यासाठी गावातील पुरुष व वारकरी संप्रदायातील महिला मंडळीनी सहकार्य केले होते. निर्णयानंतर भरविण्यात आलेल्या यात्रेत न्यायालयाच्या आदेशानुसार चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात येवून २०१४ ला या बळी प्रथेला आळा घालण्यात आला. 

तेंव्हापासून येथे एकादशीला देण्यात येणारी बळीप्रथा बंद झालेली असून, येथे बळी देणाऱ्या सर्वांची मानसिकता बदलली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा आदर करत गावकरी देखील सलग ८ वर्षांपासून उत्सव आनंदाने कोणताही बळी न देता साजरी करत आहेत. यंदा प्रतिपदा दि.०३ मार्चपासून कान्होबाच्या काठी बाहेरगावच्या भ्रमंतीला निघाली आहे, सदर कानोबा (कानिफनाथ) काठी १० दिवस विदर्भातील वेगवेगळ्या गावात दर्शन देऊन परत दि.१३ मार्च रोजी एकंबा गावात येईल. त्यानंतर सायंकाळी गावात मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात येऊन कान्होबाचा उत्सव साजरा केला जातो आहे.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी