नांदेड| मागच्या 10 वर्षापासून नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली वेलिंग्टन इंटरनॅशनल स्कूलने आता देशातील अग्रगण्य असलेल्या नारायणासोबत कोलॅब्रेशन केले असल्याची माहीती वेलिंग्टन इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष विनोद पावडे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे व जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेलिंग्टन इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष विनोद पावडे यांनी नारायणासोबत कोलॅब्रेशन नांदेडच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये भर टाकली आहे व त्यांना प्रा. कैलास पौळ यांनी मोलाचे सहकार्य केले. 10 वर्षापासून मेहनत व उच्चशिक्षित शिक्षकांच्या सहकार्याने अल्पावधीतच नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेलिंग्टन इंटरनॅशनल स्कूलचे नाव आदराने घेतले जाते.
सर्व सोयींनी युक्त अशी सुसज्ज ईमारत म्हणून वेलिंग्टनकडे पाहिले जाते. देशातील नामांकित अशा नारायणासोबत कोलॅब्रेशन करण्यामध्ये नारायणाचे राममाहेन रड्डी यांनी मोलाची भूमिका बजावली. सोबतच शैक्षणिक क्षेत्रांतील उत्तुंग व्यक्तिमत्व नारायणाचे संस्थापक नारायण सर व मणी सर यांच्या सहकार्याने सर्व गोष्टी सहज साध्य झाल्या. नारायणासोबत केलेल्या या कोलॅब्रेशनमुळे वेलिंग्टन इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष विनोद पावडे यांचे नांदेड शहरातील शिक्षणप्रेमीकडून अभिनंदन केले जात आहे.