अपंगाचा निधी वाटप करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरसमच्या ग्रामसेवकाची उचलबांगडी करा -NNL

सरसम येथील दिव्यांग बांधवानी दिले गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन; अन्यथा उपोषण  


हिमायतनगर, अनिल मादसवार|
तालुक्यातील मौजे सरसम बु.येथील ग्रामसेवकांकडून दिव्यांग लाभार्थ्यांना निधीचे वाटप करण्यास टाळाटाळ केली जात आहे. दिव्यांग बांधव निधी मागणीसाठी आले असता दिशाभूल करत उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. केवळ स्वार्थ आणि कमिशन मिळणाऱ्या कामावर जास्त जोर देणाऱ्या दांडी बहाद्दर ग्रामसेवकाची तात्काळ उचलबांगडी करावी आणि चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी सरसम बु.येथील दिव्यांग बांधवानी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये झालेल्या विविध कामातून दिव्यांग बांधवाना ५ टक्के, ३ टक्के दिव्यांगांना निधी दिला जातो. मात्र हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु. ग्रामपंचायतीसह अनेक गावातील ग्रामसेवकांनी निधी वाटपात भेदभाव सुरु करून दिव्यांगांना त्यांच्या हक्काच्या निधीपासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे दिव्यांग बांधव लाभार्थीना मागील काळात झालेले सण - उत्सव दुष्काळात साजरे करावे लागले आहे. अनेकदा दिव्यांगांनी हक्काच्या निधीसाठी ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, आमदार महोदयांच्या माध्यमातून निधीसाठी पाठपुरावा करून, अनेकांनी पंचायत समिती कार्यालय गाठून हि बाब निदर्शनास आणून दिली. मात्र सहा महिन्यापासून आजतायगत दिव्यांगांना निधी मिळाला नाही. त्यामुळे दिव्यांग बांधवाना अडचणीत दिवस काढावे लागत आहे.

या समस्येला कंटाळून दि.२० बुधवारी सरसम येथील दिव्यांग बांधवानी गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावर गटविकास अधिकाऱ्यांनी देखील समस्यांचे निराकरण करण्याचे सोडून इतके दिवस आम्हाला सूचना का..? केली नाही असे म्हणत उलट दिव्यनगांचा दोषी ठरविण्याचा प्रयत्न केल्याचे तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष ताठ समाजसेविका सीमाताई गोखले यांनी सांगितले आहे. एवढेच नाहीतर सरसम बु.येथील ग्रामसेवक भोगे हे केवळ स्वार्थ असलेली कामे करण्यावर भर देत असून, गावातही वेळेवर येत नाहीत. त्यांनी आत्तापर्यंत गावात केलेल्या निकृष्ट विकास कामाची चौकशी करावी. कारण ते कोणतेही काम कमिशन मिळत असेल तर करतात आणि ज्यात कमिशन मिळत नाही अश्या कामाकडे जाणून - बुजून दुर्लक्ष करतात. त्यांच्या या मनमानी कारभाराला कंटाळून आम्हाला उपोषणाचा हत्यार उपसावे लागत असल्याचे त्या म्हणाल्या. आतातरी अधिकाऱ्यांनी तात्काळ दिव्यांगांचा निधी वितरित करावा अन्यथा आम्हाला आगामी ०२ मे रोजी आमरण उपोषणाला बसावे लागेल असा इशारा दिला आहे. या निवेदनावर आकांक्षा गोखले, श्यामराव खिराडे, साक्षी माधव कांबळे, काजल कांबळे, अनुसया दवणे, वसंत चव्हाण, रमेश शिरपतवार, गजानन दमकोंडवार, अरुण शिंदे, लीलावती देगांवे, मधुकर खिल्लारे, यास्मिनबाई शेख, प्रशांत गोखले, पुंजाराम आहेरकर, बालाजी सुकाळाकर यांच्यासह अनेक दिव्यांग बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याबाबत गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांच्याशी दूरधवनीवरून संपर्क केला आता संपर्क होऊ शकला नाही.

सेनगाव येथील दिव्यांग साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी दिवाळीपूर्वी दिव्यांगांचा निधी तात्काळ वितरित करण्यात यावा अश्या सूचना गटविकास अधिकारी यांना केल्या होत्या. त्यानंतर हिमायतनगर येथील गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांनी तालुक्यातील ग्रामसेवकानेना निधी वाटपाबाबत जा.क्रं./पसही/पंचायत/१६२७/२०२१ दि.२७ ऑकटोबर रोजी सर्व ग्रामसेवकांना पत्र दिले होते. परंत्तू गेंड्याची कातडी ओढवलेल्या ग्रामससेवकांनी दिव्यांगांची गरज लक्षात न घेता आपला स्वार्थ साधणाऱ्या कामाकडे लक्ष देऊन दिव्यांगांना हक्काच्या निधीपासून वंचित ठेवले आहे. दिव्यांगांवर अन्याय करणाऱ्या तालुक्यातील प्रत्येक ग्रामसेवकाच्या कारभाराची चौकशी करून  कार्यवाही करावी अशी मागणी दिव्यांग बांधवांतून केली जात आहे. यावरून गटविकास अधिकारी आंदेलवाड यांचा तालुक्यातील ग्रामसेवक वचक नसल्याचे दिसून येत आहे.

दिव्यांगांना जीएसटीची अट शिथिल करावी - दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या ५ टक्के निधी वितरणात जीएसटी पावती जोडण्याची आता ठेवण्यात आल्याचे ग्रामसेवकाची म्हणणे आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवाना गेल्या सहा महिन्यापासून हक्काच्या निधीसाठी चक्का माराव्या लागत आहेत. मात्र आद्यपायी दिव्यांगांना निधी मिळला नसल्याने सरसम येथील दिव्यांग बांधवानी अखेर गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन हककच्या निधीच्या मागणीसाठी निवेदन दिले आहे. ग्रामसेवकांकडून निधी वाटपात अडवणूक केली जात असून, आता शेवटच्या टप्प्यात जीएसटीची आत असल्याने पावत्या आणून दिल्या तरच निधी देऊ असे सांगून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे जीएसटीची अट शासनाने शिथिल करवून दिव्यांगांना उदर निर्वाहासाठी दिल्या जाणाऱ्या निधीचे तात्काळ वितरण करावे अशी मागणी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी