उस्माननगर. माणिक भिसे| मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्यात सुरुवात झाली असून चार ते पाच उपवास आतापर्यंत पार पडले आहेत. यंदा रोजे चैत्र महिन्याच्यावनव्यात आल्याने मुस्लिम बांधवांची चांगलाच कस लागत आहे रोजी ठेवणाऱ्या भाविकांच्या उत्साहात मात्र कमीपणा झाल्याचे दिसत नाही.
मुस्लिम बांधवांमध्ये आत्मिक शुध्दी आणि अल्लाहवरील निस्सीम भक्तीचे प्रतीक म्हणून रमजान महिना पाळला जातो. इस्लाम धर्मामध्ये सांगितलेल्या पाच कर्तव्यापैकी रोजा हे पवित्र कर्तव्य याच महिन्यात अदा केले जाते. कुरण पठाण, रोजे, तसेच तशबीची नमाज या महिन्यात होते.रमजानमध्ये अल्लाहजवळ आपली निस्सीम भक्ती व्यक्त केली जाते.रमजान, महिन्यात नरकाचीव्दारे बंद असतात.तर स्वर्गाचे द्वार उघडलेले असते अशी श्रद्धा आहे.
दररोज पहाटे सहरीनंतर संपूर्ण दिवस अन्नपाण्यावाचून राहणे ( थूंकासुध्दा गिळता येत नाही) शिवाय चांगले विचार आणि आचार ठेवणे, कुराण पठण करणे व सायंकाळी इफ्तारच्या वेळी रोजा सोडणे रमजान महिन्यातील दिनक्रम असतो. मुस्लिम बांधवांसाठी हा महिना पवित्र मानला जातो.हिंदू बांधवांतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इतर पार्टीचे ही आयोजन करण्यात येत असल्याने गावोगावी सगळीकडे भक्ती आणि प्रेमभावनेचे वारे वाहत आहे. रमजान मुळे सामाजिक व सलोख्याची भावना निर्माण होत आहे.
ईश्वराला आत्मसमर्पण व ईश्वराचे प्रत्येक आज्ञाचे पालन होय.या पवित्र महिन्यात दानधर्म करण्याला खूप महत्त्व आहे. याच महिन्यात तरहवीची नमाजाला फार महत्त्व असते.२० वेळा प्रार्थना म्हणजे नमाज पडावी लागते. याच महिन्यात अंतिम क्षणाला शबे कदरची रात्र येत असते .ह्याला फार विशेष महत्व प्राप्त आहे ही रात्र हजार महिन्यापेक्षा तेजस्वी मानली जाते. कारण याच महिन्यात पवित्र कुरान शरीफ उतरविण्यात आले आहे. जगाचे निरोप घेतलेल्या नागरिकांसाठी या महिन्यात त्यांच्या नावाने कुराण पठण करणे पण फार पुण्याचे काम समजले जाते. शहरी पाठोपाठ ग्रामीण भागातही उपवास ठेवणाऱ्या संख्येत वाढ होत आहे. लहान मुलेही मोठ्या हिमतीने अल्लाहची उपासना करत आहेत. रमजानचा महिना हा शांतीचा व प्रेमाचा संदेश देणारा आहे.