चार दिवसांत दुसऱ्या कार्यवाहीने गुटखा विक्रेत्यांची धाबे दणाणले....!
मुखेड, रणजित जामखेडकर| कर्नाटक राज्यातून अवैधरित्या गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात आणत असताना नाका बंदीवर असलेल्या पोलिसांनी सोमवारी ५५ हजारचा गुटखा व मुद्देमाल जप्त केला आहे.चार दिवसात पोलीसांची दुसरी कार्यवाही आहे या प्रकरणी मुक्रामाबाद पोलीस स्टेशन मध्ये दोघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी कर्नाटक राज्यातून यातील नमूद आरोपीतांनी विनापरवाना बेकायदेशीररित्या सागर पान (गुटखा) सुगंधीत तंबाखू मोटार सायकल वरुण विक्री करण्याच्या उद्देशाने बावलगाव ते परतपुर फाटा ते यामार्गे मुक्रमाबादकडे नेत असताना पोलीसांना संशय आल्याने पाठलाग करुण अवैध गुटखा वाहतूक करताना इसम नामे दादाराव व्यंकटराव बोडके व अन्य एक रा.तूपदाळ असे दोघास मुक्रमाबाद नजीक चौकशी करुण त्यास ताब्यात घेतले.
यात ५५ हजार रुपयेचा गुटखा व मुद्देमाल जप्त करून आरोपीचे मुसक्या आवळल्याने अवैधधंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. चार दिवसात मुक्रमाबाद पोलिसांची ही दुसरी धाडसी कारवाई आहे. एच.सी.पठाण यांच्या फिर्यादीवरून मुक्रमाबाद पोलीस स्टेशन मध्ये रात्री उशीरा दादाराव व्यंकटराव बोडके व अन्य एक रा.तूपदाळ असे दोघा विरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि धाडसी कारवाई सपोनि संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शना खाली बिट जमादार शिवाजी आडेकर ,गोपनीय शाखेचे यादव इबीतवार,चिठ्ठलवार यांनी केली आहे. पुढील तपास सपोनि संग्राम जाधव करीत आहेत.