नांदेड| प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येमुळे नांदेड शहरात जी दहशत निर्माण झाली आहे; ती कमी करायची असेल तर बियाणी यांच्या मारेकऱ्यांचा इनकाउंटर करावा अशी मागणी भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केली .
दिवसाढवळ्या झालेल्या बियाणी यांच्या हत्येमुळे सर्वसामान्य व्यापारी तसेच प्रतिष्ठित उद्योजक हादरले आहेत. नांदेडचा बिहार होतो की काय अशी भावना नागरिकांमध्ये पसरली आहे. या हत्तेमुळे खंडणी चे प्रकार आणखी वाढतील आणि जीवाच्या भीतीपायी अनेक जण गुपचूप खंडणी देतील. त्यामुळे शहरात निर्माण झालेली दहशत व सर्वसामान्य नागरिकांची भीती कमी करायची असेल तर पोलिसांनी आरोपींना त्वरित अटक करावी.
तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या प्रमाणे पोलिसांनी पूर्ण सूट द्यावी. हैदराबाद पोलिसांनी बलात्कार करणाऱ्यांचा इनकाउंटर केल्यामुळे त्यानंतर सामूहिक बलात्कार झाले नाहीत . त्याचप्रमाणे जर बियाणी यांच्या मारेकऱ्यांचा इन्काऊंटर केलातर अशाप्रकारे हत्या करण्याची हिंमत भल्याभल्या गुंडांची होणार नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात वरील प्रमाणे कारवाई करावी अशी मागणी दिलीप ठाकूर यांनी केली आहे.