निळा गावात पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक -NNL

शिक्षक व ग्रामस्थ यांचा उपक्रम 


लोहा|
गावकरी ते राव न करी असं म्हटलं जातं ते पुन्हा एकदा खर ठरविले आहे, ते निळा या ग्रामस्थांनी या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. येथील शिक्षक उपक्रमशील त्यानी ग्रामस्थांच्या सहकार्याने  शाळापूर्व  तयारी करताना पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून गावभर मिरवणूक काढली.लेझीमची चाल..झुली घातलेले बैल..गाडीची सजावट असा सगळा साज गावकऱ्यांच्या उत्साहाला द्विगुणित करणारे होते.

लोहा तालुक्यातील जि प. प्रा शा निळा  येथे गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शालेय उपक्रम राबविले जातात शाळापुर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. पहिल्या वर्गात  प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे फेटा, हार, उजळणीचे पुस्तक देऊन व ओवाळणी करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. बैलगाडीतून सर्व विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. लेझीम पथक .झुल घातलेले बैल ..बैलगाडी सजवलेली त्यात विद्यार्थी बसलेले .... गावभर जंगी मिरवणुक काढण्यात आली

बैलगाडी सजवण्याचे काम गावातील नागरीक गोविंदराव पाटील मोरे यांनी केले. शाळापुर्व तयारी संबधीत गीत सादरीकरण उपक्रमशील शिक्षक विशाल महाबळे यांनी केले. सौ. कस्तुरकर मॅडम   सौ. मोरे मॅडम, सौ. स्वामी मॅडम, विशाल महाबळे, लांडगे सर, शेख सर, श्री मठपती यांनी वेगवेगळ्या सात टेबलवर  विद्यार्थ्यांच्या  क्षमता तपासण्यात आल्या व त्यांची नोंद कार्डवर घेण्यात आली. 

या कार्यक्रमासाठी केंद्र प्रमुख अशोक आढाव, विषयतज्ञ अकोले केंद्रिय मुख्याध्यापक श्री किडे यांची विशेष उपस्थित होती सरपंच बालाजी गजले, उपसरपंच गजानन पा. मोरे, माजी सरपंच बाबाराव पा. मोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.उज्वला संतोष मोरे, उपाध्यक्ष संतोष गोविंदराव मोरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य कल्याणराव मोरे, गजानन बालाजी मोरे, रामचंद्र मोरे, जयपाल जोंधळे, सौ. ज्योती अंगद भुजबळ, योगेश इंगळे, अंगणवाडी ताई सपना कुलकर्णी, सौ सागरबाई मोरे, संतोष संभाजी मोरे, रामचंद्र मोरे, उमर शेख उपस्थित होते.संचलन विशाल महाबळे यांनी तर शेख यांनी आभार मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी