रासायनिक खत दुकानदार मोठ्या प्रमाणात खतांचा साठा करुन ठेवत आहेत. अशिक्षीत शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू असल्याचा प्रकार दिसत आहेत. दरम्यान, काही ठिकाणी शेतकऱ्यांना जी खते घ्यायचे आहेत त्याच्यासोबत इतरही खतांचे किंवा औषधांची बळजबरीने खरेदी करण्याचा कृषी सेवा केंद्रांकडून आग्रह केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सहजासहजी रासायनिक खते उपलब्ध होत नाहीत.
खते मिळाली तरी विनाकारण जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे. डि ए पी हे खत सर्व कृषी केंद्र यांच्या गोदामात आहे. पण आजच कृषी संचालक चढ्या दराने खतांची विक्री करत आहेत आपल्या तालुक्यातील खत साठा काही कृषी केंद्रातून दुसऱ्या जिल्हात किंवा विदर्भातील बोरी, कोपरा, चातारी, गाजेगाव या गावात मोठ्या प्रमाणात जात आहे नंतर तालुक्यातील अल्प भूधारक शेतकऱ्यांना खतांची खुप मोठी समस्या निर्माण होईल त्या साठी कृषी विभाग हिमायतनगर यांनी आज नियोजन करावे व कृषी केंद्र संचालकांवर लक्ष ठेवावे कृषी केंद्रातून अवाच्या सव्वा भावाने शेतकऱ्यांना विक्री केली जाते आहे यास जबाबदार कोण आहे..
शेतकऱ्यांच्या मागणी जोर धरत आहेत
खते उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खत टंचाईचा सामना करावा लागत आहे. या कृत्रिम खते टंचाईच्या विविध कृषी सेवा केंद्र मालकांकडून शेतकऱ्यांना वाढीव दराने खताची विक्री सुरू आहेत. तसेच ज्या खतांची शेतकऱ्यांना गरज नाही तेही खते घेण्याची कृषी सेवा केंद्राकडून बळजबरी केली जात आहे. शेतकरी या कृत्रिम खतांचा यामुळे त्रस्त झाले आहेत. कृषी विभागाने तात्काळ मुबलक प्रमाणात व वाजवी दरात खतांचा पुरवठा होईल यासाठी पावले उचलावी. तसेच सर्व खते विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांची तात्काळ तपासणी करून खतांचा साठा तपासावा. वाढीव दराने होणारी खत विक्री व बळजबरीने इतर खते औषधे घेण्याची सक्ती शेतकऱ्यांना करु नये असे लेखी आदेश काढावेत. शेतकऱ्यांना सहजासहजी रासायनिक खतांची उपलब्धता व्हावी, यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.