हदगाव विधानसभा क्षेञातील 132 गावांना मिळणार फिल्टर पाणी - आ. माधवराव पाटील जवळगावकरांच्या पाठपुराव्यांला यश -NNL

558 कोटी रुपयाची 132 गावासाठी योजना झाली मंजूर


हदगाव,शे चांदपाशा|
हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील 132 गावांना फिल्टर युक्त पाणी मिळावे या साठी आ माधवराव पाटील जवळगावकर यांनी पाणी पुरवठा मंत्री नां. गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी करत महाराष्ट्र जिवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या सुचना दिल्या होत्या. सदर योजना मंजूर होण्यासाठी आ जवळगावकर यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. 

त्यामुळे दि.22 एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनांच्या पाणी पुरवठा विभागाने शासन निर्णय क्रमांक ग्रा. पा. पू. 2022/प्र क्र 112/पा. पु 18 अन्वये सदर 132 गावातील ग्रिड पाणी पुरवठा योजनेस 558 कोटी रूपये मंजुरीचा आदेश काढला. त्यामुळे हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील 132 गावांना फिल्टरचे पांनी मिळणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सध्या स्थितीतील मजूर असलेल्या पेयजल मधील सगळ्यात मोठी योजना आहे हे विशेष.

योजनेचे स्वरूप - सदर योजनेचे पंप हाउस इसापूर येथे होणार असून सदर ठिकांनांवरुन पाणी भाटेगाव उमरी येथे फिल्टर हाउस पाणी लिफ्ट करून फिल्टर झालेले पाणी पिंगळी, कोळी, पळसा, मनाठा, कामारवाडी, सोनारी,  हिमायतनगर, या ठिकाणी मोठ्या टाक्या उभारून सदर टाक्यातुन 132 गावांना गावात टाक्या उभारून त्यातून गावात अंतर्गत पाणी पुरवठा पाईप लाइन करून घरोघर या योजनेद्वारे पाणी पोहचनार आहे. सदर योजनेसाठी 1200 किलोमीटर पाईप लाइन लागणार आहे. सदर योजनेसाठी इसापूर धरणातून मिळणारे पाणी आरक्षण सुध्दा शासनांकडून प्राप्त झाले आहे.

पाणी पुरवठा मंजूर झाल्याच्या अनुषंगाने आ.जवळगावकर यांनी सांगितले कि, अशोकराव चव्हाण पालकमंञी यांच्या संकल्पनेतुन व पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या सहकाऱ्यांन महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी योजना मंजूर झाली. हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्याची कायम स्वरूपी सोय व्हावी. या द्रुष्टीने इसापूर धरणातून पाणी लिफ्ट करून तालुक्यातील गावांना पुरवठा करण्यासाठी 132 गावासाठी ग्रिड पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी सतत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सोबत बैठका घेऊन चर्चा केली. त्या अनुषंगाने पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार्य लाभले त्यामुळे माझ्या मतदार संघात 558 कोटी रुपयाची 132 गावांसाठी पाणी पुरवठा योजना मजूर झाली त्या बद्दल आ. जवळगावकर यांनी आभार मानले.

आमदार पञकारापासुन दुर का...? या पुर्वी हदगाव विधानसभाक्षेञाचे आ माधवराव पाटील जवाळगावकर हे हदगाव तालुक्यातील काही मोजके पञकार वगळता विद्यमान आमदार दुरच राहत आहे. जरी भेटले तरी ते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गराडयात राहतात. यामुळे तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक शहरातील परिसरातील समस्या बाबतीत चर्चा करायावयास त्याच्या नियोजित कार्यक्रमामुळे वेळच नसतो ही वस्तुस्थिती आहे. यापुर्वी माञ आमदार सहज भेटायचे विकासकामा बाबतीत चर्चा पञकारासोबत करायाचे. आता माञ भेट म्हणजे फारच दुर्मिळ झाल्याने या बाबतीत नेमके कारण काय..? असावे या बाबतीत पञकारांत चर्चा आहे.

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी