डॉ. हंसराज वैद्य यांची वर्ष २०१८ च्या नांदेड भूषण पुरस्कारासाठी निवड -NNL


नांदेड|
सर्वच क्षेत्रात अष्टपैलू कार्य करणारे डॉ. हंसराज वैद्य यांची वर्ष २०१८ च्या नांदेड भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, त्यांना १४ व १५ मे रोजी कै.चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान, नांदेड येथे होणाऱ्या नरेंद्र- देवेंद्र महोत्सव मध्ये रोख रु. ५०००, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व महावस्त्र देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष डॉ. सचिन उमरेकर व संयोजक धर्मभूषण ॲड दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

यापूर्वी नांदेड भूषण अथवा नंदिग्राम भूषण पुरस्काराने सुधाकरराव डोईफोडे,संतबाबा बलविदरसिंघजी,जगदीश महाराज, अनंत नागापूरकर, डॉ . बाळासाहेब साजणे, प्राचार्य गो.रा.म्हैसेकर, त्र्यंबक वसेकर,प्रा . शेषराव मोरे ,प्रा . दता भगत ,डॉ.शिवाजी शिन्दे,ॲड . डॉ . आर . एन . खांडिल, डॉ .सविता भालेराव, संतबाबा नरेंद्रसिंघजी, राजेंद्र हुरणे, नवीनभाई  ठक्कर, संजीव कुलकर्णी, डॉ.साहेबराव मोरे, माधवराव झरीकर, रतन पेंटर यांना गौरवण्यात आले आहे. काही अपरिहार्य कारणामुळे चार वर्षापासून पुरस्काराचे वितरण करण्यात आले नव्हते. आता कोरोनाचे निर्बंध उठल्यामुळे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजप जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांच्या मार्गदर्शनाखाली  नरेंद्र- देवेंद्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. देशातील नामवंत कवींना व हास्य कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. डॉ.वैद्य व इतर तिघांना नांदेड भूषण पुरस्कार देतांना नागरिकांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन उमरेकर व भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

डॉ. हंसराज वैद्य यांचा अल्पपरिचय: स्वातंत्र्य सैनिकाचा पुत्र असलेले डॉ . हंसराज वैद्य यांनी केलेल्या वैद्यकिय , शैक्षणिक , सामाजिक , साहित्यिक, सांस्कृतिक , क्रिडा , कृषी तथा राजकिय, समाजोपयोगी कार्याची दखल घेवून अनेक संस्थानी त्यांचा यथोचित गौरव केला आहे .  १९७९ पासून नांदेड येथे वैद्य रुग्णालयात अहर्निश रात्रंदिवस वैद्यकिय सेवा . गेल्या 35 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत . दैनिक संदेशभवन व दैनिक समिक्षाचे मानद संपादक. महर्षी दयानंद सरस्वती मिशन ,इंडियन हेल्थ ऑर्गनायजेशन, डॉ . भालचंद्र नेत्र आरोग्य संघटना,उदयगिरी गृहनिर्माण संस्था,नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरीक समन्वय समिती ,सहयोग ज्येष्ठ नागरीक संघ वजिराबाद चौक नांदेड, बळीराजा शिक्षण प्रसारक मंडळ ,पद्मश्री शामरावजी कदम होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय सिडको व प्राथमिक शाळा लिंबगाव ,लायन्स क्लब नांदेड,इंडियन मेडिकल असोशियशन ,अखिल भारतीय बालक परिषद शाखा नांदेड, विद्यासंवर्धन विकास मंडळ लोहारा ता . उदगिर जि . लातुर,मराठवाडा ज्योतिष्य मंडळ नांदेड ,नांदेड भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्था नांदेड ,जिजामाता धर्मशाळा सार्वजनिक न्यास नांदेड ,कलामंदिर नांदेड ,मराठवाडा लोकसेवा मंडळ संचलित नेरली कुष्टधाम नंदनवन,महाराष्ट्र ज्येष्ठ नागरीक महासंघ फॅस्कॉम पर्यावरण समिती वर विविध पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. अनेक परिषदा , साहित्य संमेलने तथा अधिवेशन अशा आठ विविध कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पद भुषविले . 

मुलांचे निरीक्षक गृह ,महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेत बालकांसाठी सर्वागिंन विकास कार्य. महिला व बाल कल्याण मंडळ महाराष्ट्र शासन तसेच महिला बालविकास समिती महाराष्ट्र शासन अध्यक्षपदावर कार्य केल्याचा अनुभव.  महिला तक्रार निवारण , महिला समुपदेशन ,  महिला विधी विषयक प्रबोधन , दुभंगलेले संसार जुळविणे ,निराधार, विधवा, परित्यक्त्या महिलांचे पुर्नवसन , स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध , महिला कौटूबिंक अत्याचार इत्यादी विविध प्रश्ना वरील ३५ वर्षापासूनचा दांडगा कार्यानुभव . पोलीस दलात पोलीस मित्र म्हणून निवड .अंधश्रध्दा निर्मुलन क्षेत्रात गेली ३५ वर्षापासून भरिव  योगदान . आतापर्यंत ३ काव्य संग्रह  प्रकाशित. आई या विषयावरील गितांच्या २ सिडीज भारताच्या राष्ट्रपती  प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन दिल्ली येथे प्रकाशित .सहयोग ज्येष्ठ नागरिक संघात नांदेड जिल्ह्यातुन १७५०० ज्येष्ठाची नोंदणी व ज्येष्ठासाठी अहोरात्र कार्य .

तायक्वॉम्दी, आचरी व जुडो, उश, लंगडी इ. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाच्या अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करून उत्कृष्ट खेळाडु घडविण्याचे प्रयत्न. आसदवन, विष्णुपुरी, मुसलमानवाडी आणि डेरला या  भागातील स्वशेतीत फळ बागा व शेती भोवती हजारो वृक्षाची लागवड करून पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या प्रयत्न, शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी अनेक शेती तथा कृषी जाणीव शिबीराचे आयोजन, शेतीला काटेरीवृक्ष कुंपन वरदान व पडीत शेतीत फळ झाडे सहज शक्य एक अनोखा उपक्रम.

फेस्कॉमचा उत्कृष्ठ ज्येष्ठ नागरिक पुरस्कार, महाराष्ट्र अंध तथा सक्षम संस्थेमार्फत दिव्यांग मित्र पुरस्काराने सन्मानित . माननीय राज्यपालांच्या हस्ते साहित्यरत्न पुरस्कारने सन्मानित. महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत क्रीडा संघटक म्हणून पुरस्कार .वैद्यकीय क्षेत्रात क्षेत्रात ७ तर साहित्य क्षेत्रात ६ यासह एकूण १३५ पुरस्कार व सन्मानचिन्हे प्राप्त.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी