मुबंई। आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. घंटाधारी हिंदूवादयानी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्याला राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. काही लोकांना हिंदू असल्याची लाज वाटते. आणि आता तर नवीन हिंदुत्व आलं. घंटाधारी आणि गदाधारी असं म्हणत फडणवीस यांनी चिमटा काढला.
ते म्हणाले आम्ही गदाधारी आहोत . मी म्हणालो तुम्ही गदाधारी आहात की नाही माहीत नाही. पण रोज सकाळी टीव्ही पहिल्यावर असं वाटत की तुम्ही गधाधारी नक्कीच आहात असं फडणवीस म्हणाले आणि सभागृहात एकच हसा पिकला. हिंदुत्व जगणारे आम्ही आहोत . हिंदुत्व संकुचित नाही आहे . त्यात जाती - धर्म असा भेद नाही आहे . हिंदुत्व म्हणजे सर्वसमावेशकता आहे . हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता आहे . आणि हाच भाव घेऊन हिंदुत्व जगणारे नेते अमित भाई शाह आहेत अस देवेंद्र फडणवीस म्हणाले .